Chevrolet लवकरच लॉन्च करणार शानदार इलेक्ट्रिक कार, टीझर रिलीज; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 04:42 PM2022-04-27T16:42:52+5:302022-04-27T16:43:38+5:30

Chevrolet ने नुकतीच पूर्ण इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या इलेक्ट्रीफाईड कारचे नाव कॉर्व्हेट (Corvette) असेल, जी पुढील वर्षी बाजारात येऊ शकते.

chevrolet released teaser of electrified car corvette | Chevrolet लवकरच लॉन्च करणार शानदार इलेक्ट्रिक कार, टीझर रिलीज; जाणून घ्या

Chevrolet लवकरच लॉन्च करणार शानदार इलेक्ट्रिक कार, टीझर रिलीज; जाणून घ्या

Next

नवी दिल्ली : जनरल मोटर्स कंपनी ही एक अमेरिकन ऑटोमेकर कंपनी आहे, जी आपली वाहने अनेक ब्रँड अंतर्गत विकते. कंपनीचे मुख्यालय अमेरिकेतील डेट्रॉईट, मिशिगन येथे आहे. ही कंपनी अमेरिकेतील सर्वात मोठी ऑटोमोबाईल उत्पादक आणि जगभरातील सर्वात मोठी कंपनी आहे. शेवरले (Chevrolet) हा देखील या कंपनीचा ब्रँड आहे.

2017 मध्ये Chevrolet भारतीय बाजारातून बाहेर पडली होती. दरम्यान, Chevrolet ने नुकतीच पूर्ण इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. या इलेक्ट्रीफाईड कारचे नाव कॉर्व्हेट (Corvette) असेल, जी पुढील वर्षी बाजारात येऊ शकते. या मॉडेलसह Chevrolet बाजारात पुनरागमन करू शकते.

हायब्रिड एडिशनचे संकेत
ऑल-व्हील-ड्राइव्ह सेट-अप टीझर व्हिडिओमध्ये पाहिले जाऊ शकते आणि बॅकग्राउंड V8 इंजिनचा नॉइज आहे, जो हायब्रिड एडिशनचे संकेत देत आहे. जनरल मोटर्सचे सीईओ मार्क रीस यांनी देखील लिंक्डइनवर पुष्टी केली आहे की, पहिले इलेक्ट्रीफाईड कॉर्व्हेट 2023 मध्ये लॉन्च होणार आहे आणि इलेक्ट्रिक एडिशन जीएमच्या नवीन अल्टियम प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल.

कॉर्व्हेट ई-रे नावाचा ट्रेडमार्क वापरला जाण्याची शक्यता
पहिल्या इलेक्ट्रीफाईड कॉर्व्हेटमध्ये सध्याच्या इंजिनच्या संयोगाने काम करणारी एक छोटी बॅटरी असेल, ज्याची पुढची चाके ट्विन मोटर्सद्वारे विजेवर चालतात, तर V8 मागील बाजूस असेल. दरम्यान, दोन्ही गाड्यांची अधिकृत नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत. Chevrolet ने 2015 मध्ये कॉर्व्हेट ई-रे नावाचा ट्रेडमार्क केला होता आणि तो कदाचित इलेक्ट्रिक एडिशनसाठी वापरला जाईल.

येत्या काही दिवसांत अधिक माहिती मिळण्याची शक्यता
कॉर्व्हेटच्या इलेक्ट्रीफाईड एडिशनसाठी 2019 मध्ये C8 जनरेशन लाँच करताना पहिल्यांदा संकेत दिले होते, ज्यामध्ये सूत्रांनी सांगितले की पॉवरट्रेन इलेक्ट्रिकला परवानगी देण्यासाठी डिझाइन करण्यात आली होती. दरम्यान, येत्या काही महिन्यांत नवीन Chevrolet कॉर्व्हेट मॉडेलबद्दल अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

Web Title: chevrolet released teaser of electrified car corvette

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.