शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

टोयोटाची नवी कार ठरणार आपल्या कुटुंबाची 'गार्डियन'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2019 16:54 IST

ड्रायव्हर चुकत असल्यास गाडी ऑटोमॅटिक सेल्फ कंट्रोल होणार

चालक चुकल्यास, दारू पिऊन कार चालवत असल्यास त्याच्याकडून कारचा ताबा काढून घेऊन सुरक्षा पुरविणारी टोयोटाची गार्डीयन ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. 2020 मध्ये या प्रणालीची सेल्फ ड्राइविंग कार उपलब्ध करण्यात येणार आहे, असे टोयोटा रिसर्च इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी  गिल प्रॅट यांनी सोमवारी सांगितले.

टोयोटाच्या फुल्ल सेल्फ ड्राइविंग सिस्टमपेक्षा ही नवीन प्रणाली वेगळी असून गरज पडल्यास कार स्वतःच ताबा घेईल आणि पुढे जात राहील, असे प्रॅट यांनी वार्षिक सीईएस ग्लोबल टेचनोलॉजि कॉन्फरन्समध्ये सांगितले. ही नवीन प्रणाली इतर ऑटो कंपन्यांना देखील उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टोयोटाने त्यांच्या सेल्फ ड्राइविंग प्रणालीच्या कारसाठी ड्युल ट्रॅक strategy वापरली आहे. गार्डीयन ही प्रणाली अत्यंत आधुनिक अशी ड्रायव्हरसाठी मदत करणारी प्रणाली असल्याचे इन्स्टिट्यूटचे वरीष्ठ उपाध्यक्ष रेयान युस्टीस यांनी सांगितले. 

गार्डीयन प्रणाली नेमकी आहे तरी काय? गार्डीयन म्हणजे पालकत्व किंवा संरक्षण करणे होय. ही प्रणाली तिचा अर्थ सार्थ ठरवते. ही प्रणाली कार समोरच्या एखाद्या वस्तूवर आदळणार असेल तर कारचा त्वरित ताबा घेते आणि वाचवते. तसेच एखादे वाहन समोरून येत असल्यास किंवा त्याचा एकदम जवळ आल्यास चालकाकडून नियंत्रण काढून घेऊन स्वतः त्या वाहनाच्या रेषेतून बाजूला होते. 2020 मध्ये ही प्रणाली कारसाठी उपलब्ध होणार असून यामुळे अपघाती मृत्यू कमी होतील असा विश्वास इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

जगभरात दरवर्षी 1.3 दशलक्ष मृत्यू रस्ते अपघातात होतात. सेल्फ ड्राइविंग कार्सचा बाजार हा 10 ट्रीलिअन डॉलर एवढा प्रचंड आहे. या कारमुळे अपघात रोखता येतील. यामुळे अनेक जीव वाचतील, असे मत फोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिम हॅकेट यांनी सांगितले.

गार्डीयन ही प्रणाली विकसित करण्यासाठी टोयोटाला तीन वर्षे लागली. चालक जेव्हा घाबरलेला असेल, दारू पिलेला असेल किंवा धोकादायक पद्धतीने कार चालवत असेल तेव्हा ही कार त्याला निष्क्रिय करणार आहे. त्याच्याकडील स्टीअरिंग, ब्रेक, क्लच, गिअर याचा ताबा काढून घेऊन ती काम करणार आहे. या कारमध्ये कॅमेरा, सेन्सर हे सेल्फ ड्राइविंग कारसारखेच आहेत, मात्र कार्यप्रणाली ही वेगळी असणार आहे. ही प्रणाली चालकाच्या चुका तात्काळ दुरुस्त करून सुरक्षित प्रवास करणार आहे. 

टॅग्स :CES 2019सीईएसcarकारAutomobileवाहनtechnologyतंत्रज्ञानToyotaटोयोटा