शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
4
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
5
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
6
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
7
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
8
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
9
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
10
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
11
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
12
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
13
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
14
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
15
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
16
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
17
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
18
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
19
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
20
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत

Car Tips: बसमध्ये सरळ, पण कारमध्ये तिरकी का असते विंडशील्ड? जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 16:23 IST

Car Windshields: तुम्ही पाहिलं असेल बसेसमध्ये सरळ विंडशील्ड उपलब्ध असताना कारची विंडशील्ड तिरकी असते. मग असे का होते याचा कधी विचार केला आहे का?

तुम्ही पाहिलं असेल बसेसमध्ये सरळ विंडशील्ड उपलब्ध असताना कारची विंडशील्ड तिरकी असते. मग असे का होते याचा कधी विचार केला आहे का? कार उत्पादक कार्समध्ये सरळ विंडशील्ड का देत नाहीत असा विचार तुम्ही कधी केला आहे का? आपण याचबद्दल जाणून घेऊया. याचे एका शब्दात उत्तर द्यायचं झालं तर ते म्हणजे एअरोडायनॅमिक्स. कार्सना अधिक एअरोडायनॅमिक बनवण्यासाठी विंडशील्ड तिरक्या असतात. बसेसपेक्षा कार अधिक एअरोडायनॅमिक असतात.

अधिक सोप्या शब्दात सांगायचे तर, कारची विंडशील्ड तिरकी असल्याने हवा सहजरित्या कापली जाते आणि कार पुढे जात राहते. परंतु, जर विंडशील्ड पूर्णपणे सरळ असेल, तर कार पुढे जात असताना, त्यावर वाऱ्याचा अधिक जोर लागू होईल. त्यामुळे कार पुढे जाण्यात समस्या निर्माण होईल. असे झाल्यास, कार पुढे नेण्यासाठी अधिक शक्ती लागेल, ज्यामुळे इंजिनवर ताण येईल.

कारचे विंडशील्ड बसवतानाच केवळ एरोडायनॅमिक्सची काळजी घेतली जात नाही, तर संपूर्ण कारचं डिझाईन करतानाही ती घेतली जाते. ज्या कार्सचा वेग जास्त असतो, त्यांचं इंजिनही शक्तिशाली असतं. यासोबतच त्यांचं एअरोडायनॅमिक्स अधिक चांगलं असतं. 

लॅमिनेटेड अँड टेम्पर्ड विंडशील्डविंडशील्ड साधारणपणे दोन प्रकारचे असतात, लॅमिनेटेड आणि टेम्पर्ड. लॅमिनेटेड विंडशील्ड हे टेम्पर्ड विंडशील्डपेक्षा चांगले मानले जाते. कारण ते बनवण्यासाठी दोन ग्लास वापरले जातात आणि त्याच्यामध्ये प्लास्टिक असते, त्यामुळे अपघात झाल्यास ते सहजपणे तुटत नाही.

टॅग्स :carकारAutomobileवाहन