टाटांचा संघर्ष फळाला! ह्युंदाईला मागे टाकून TATA Motors बनली नंबर दोन, आता मारुतीची बारी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 01:48 PM2022-01-02T13:48:00+5:302022-01-02T13:48:39+5:30

TATA Motors च्या गाड्यांची विक्री सातत्यानं वाढत आहे. २०२१ हे वर्ष टाटा मोटर्ससाठी अतिशय उत्तम ठरलं आहे.

Car Sales December 2021 Tata Motors Surpasses Hyundai To Become No 2 Carmaker In India | टाटांचा संघर्ष फळाला! ह्युंदाईला मागे टाकून TATA Motors बनली नंबर दोन, आता मारुतीची बारी...

टाटांचा संघर्ष फळाला! ह्युंदाईला मागे टाकून TATA Motors बनली नंबर दोन, आता मारुतीची बारी...

googlenewsNext

टाटा मोटर्सच्या (TATA Motors) गाड्यांची विक्री सातत्यानं वाढत आहे. २०२१ हे वर्ष टाटा मोटर्ससाठी अतिशय उत्तम ठरलं आहे. डिसेंबर महिन्यात टाटा मोटर्सनं दुसऱ्या क्रमांकाची कंपनी ह्युंदाईलाही (Hyundai) मागे टाकलं आहे. यानंतर टाटा मोटर्स आता विक्रीमध्ये दुसऱ्या क्रमांकामध्ये आली आहे.

देशातील दिग्गज कार कंपनी टाटा मोटर्स (TATA Motors) नं डिसेंबर २०२१ मध्ये वार्षिक आधारावर ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रवासी वाहनांची विक्री केली आहे. कंपनीनं डिसेंबर महिन्यात एकूण ३५,२९९ प्रवासी गाड्यांची विक्री केली. डिसेंबर २०२० मध्ये कंपनीनं एकूण २३५४५ गाड्या विकल्या होत्या.

चिपचं संकट
चिपच्या संकटामुळे गाड्यांच्या विक्रीवरही मोठा परिणाम झाला आहे. विक्रीमध्ये मारुती सुझुकी इंडिया (Maruti Suzuki India) आताही पहिल्या क्रमांकावर आहे. परंतु डिसेंबर महिन्यात मारुतीच्याही गाड्यांची विक्री कमी झाली आहे. तर दुसरीकडे टाटा मोटर्सच्या गाड्यांची मागणी वाढली. मारुतीनं डिसेंबर २०२१ मध्ये एकूण १,५३,१४९ युनिट्सची विक्री केली होती. तर दुसरीकडे डिसेंबर २०२० मध्ये कंपनीच्या १,६०,२२६ गाड्यांची विक्री झाली.

हेही वाचा
Tata Motors Cars History: टाटा मोटर्सने लाँच केलेली पहिली कार कोणती? सफारी, सुमो की दुसरीच...

Electric Scooter Selection: कन्फ्यूज होऊ नका! ओला, ओकिनावा की एथरची ईलेक्ट्रीक स्कूटर बेस्ट?

Web Title: Car Sales December 2021 Tata Motors Surpasses Hyundai To Become No 2 Carmaker In India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.