शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रात्री हायवेवर कार पार्किंग करताना अतिदक्षता घेणे महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 14:10 IST

महामार्ग, द्रुतगती महामार्ग यावर कार पार्क करताना अतिदक्षता महत्त्वाची आहे. विशेष करून रात्री पार्क करताना विनाकारण कार उभ करू नये, केल्यास प्रथम पार्किंग लाइट चालू करावेत

ठळक मुद्देवाहन बिघडले असेल तर त्यासाठी पार्किंग लाइट चालू करून कारच्या मागे सुमारे १० मीटर अंतरावर सुरक्षा ट्रँगल लावावादुभाजक नसणाऱ्या महामार्गावर रस्त्याच्या डाव्या बाजूला शक्य तितकी आतमध्ये कार लावावी

महामार्गावर कार चालवताना वा वाहन चालवताना जशी काळजी घ्यावी लागते, तशीच महामार्गावर ते वाहन पार्क करताना वा बाजूला उभे करतानाही काळजी घ्यावी लागते. विशेष करून रात्रीच्यावेळी ही काळजी अधिक स्वरूपात घेणे महत्त्वाचे असते. महामार्ग दुभाजक असणारा असो की द्रुतगती, त्यावर कार पार्क करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कार ही अवजड वाहनांच्या तुलनेत लहान व हलकी असते, त्यामुळे ती पार्क करताना रस्त्याच्या बाजूला योग्य जागा बघून पार्क कराच. एकेरी रस्ता असताना रस्त्यावरून दोन वाहने समोरासमोर जात असताना साइड देत असतात, त्यावेळी ती रस्त्याच्या डाव्या बाजूला काहीशी येतात.

मुंबई-पुणे यासारख्या द्रुतगती महामार्गावर दोन्ही बाजूला मिळून जवळजवळ सहा पदरी मार्ग आहेत. प्रत्येक मार्ग स्वतंत्र आहे व रस्त्याला दुभाजक असल्याने समोरून येणारे वाहन हे तुमच्या रांगेत येणार नाही. मात्र डाव्या बाजूला वाहन पार्क करण्यासाठी जेथे जागा आहे. तेथे ते वाहन उभे करताना अतिशय सावधपणे व जास्तीतजास्त डाव्या बाजूला उभे करावे. ते ही विनाकारण वा टाइमपास करण्यासाठी नव्हे. गरज असेल तरच ते उभे करावे. वाहन रात्रीच्यावेळी उभे करताना रस्त्याच्या पूर्ण डाव्या बाजूला उभे करावे व पार्किंग लाइट त्वरेने चालू करावेत.

वाहन बिघडले असेल तर त्यासाठी पार्किंग लाइट चालू करून कारच्या मागे सुमारे १० मीटर अंतरावर सुरक्षा ट्रँगल लावावा. कारमधील वा वाहनामधील प्रवाशांनी रस्त्यावर विनाकारण येऊ नये. द्रुतगती महामार्ग असो की साधा महामार्ग असो येणारी वाहने वेगाने येत असतात, ती चालवणाऱ्याला रात्रीच्यावेळी एखादी व्यक्ती मध्ये आले तर गोंधळायला होऊ शकते. त्यामुळे कार पार्किंग करणे हे अतिशय गरजेचे असेल तरच करावे. दुभाजक नसणाऱ्या महामार्गावर रस्त्याच्या डाव्या बाजूला शक्य तितकी आतमध्ये कार लावावी. तसेच जर रस्त्याच्या बाहेर काही जागा असेल तरी तेथे कार लावावी, कार पार्किंग लाइट चालू ठेवावेत. तसेच जरी रस्त्यापासून आतमध्ये बऱ्यापैकी अंतरात जरी कार लावली असेल तरी आतील प्रवाशांनी विनाकारण रस्त्यावर बाहेर येऊ नये. कार बिघडली असेल तर रस्त्याच्या काहीशा कडेला ती लावली गेली तर अधिक दक्षता घ्यावी.

ठळक मुद्दे रस्त्याच्या डाव्याबाजूला कार उभी करावीपार्किंग लाइट चालू करावेत.हेडलॅम्प अप्परमध्ये चालू ठेवू नयेत. त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या चालकांना त्रास होतो.कारमधील प्रवाशांनी रस्त्यावर विनाकारण रस्त्यावर वावरू नये.लहान मुलांनाही कारमधून बाहेर येण्यापासून रोखावे.सुरक्षा रिफ्लेक्टर ट्रँगलचा कारमागे वापर करावा

टॅग्स :carकारAutomobileवाहनAccidentअपघात