शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 20:25 IST

BYD Seal Electric Car: चीनी कार उत्पादक कंपनी BYD ने भारतात आपली नवीन 2025 Seal EV लॉन्च केली आहे.

BYD Launched Seal Electric Car: चिनी ऑटोमोबाईल कंपनी BYD (बिल्ड युवर ड्रीम्स) ने भारतीय बाजारात त्यांची नवीन इलेक्ट्रिक सेडान सील (Seal Electric Car) लॉन्च केली आहे. याची सुरुवातीची किंमत 41 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. कंपनीने यात अनेक अपग्रेड्स दिले आहेत. या कारची उत्कृष्ट रेंज, उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि जास्त काळ चालणारी बॅटरी, हे फिचर्स या कारला इतर इलेक्ट्रिक कारपेक्षा वेगळी बनवतात.

बॅटरी, चार्जिंग आणि रेंज बीवायडी सीलमध्ये लिथियम आयर्न फॉस्फेट (एलएफपी) बॅटरी आहे, जी 15 वर्षांचे आयुष्य देते. पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 650 किमीची रेंज देते. तसेच, डीसी फास्ट चार्जरसह कारला फक्त 15 मिनिटांत 200 किमी प्रवास करण्याइतके चार्ज करता येते. तर, 80% चार्ज होण्यासाठी फक्त 45 मिनिटे लागतात.

आलिशान केबिन BYD सीलचा आतील भाग अतिशय प्रीमियम आणि आधुनिक आहे. यात 15.6 इंचाची टचस्क्रीन आहे. यासोबतच 10.25 इंचाचा फुल डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळेल. ही कार क्रिस्टल गिअरशिफ्ट, वायरलेस चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले (HUD) आणि फुल मेटल बॉडीने सुसज्ज आहे, ज्यामुळे ती आणखी खास बनते. BYD सीलला वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto सपोर्ट मिळतो. 

कारचे परिमाण आणि स्टोरेजBYD सीलची लांबी 4800 मिमी, रुंदी 1875 मिमी आणि उंची 1460 मिमी आहे. त्याचा व्हीलबेस 2920 मिमी आहे, तर कारचा ग्राउंड क्लिअरन्स 149 मिमी आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर, यात 53 लिटर फ्रंट ट्रंक स्पेस आणि 400 लिटर बूट स्पेस आहे.

BYD सील व्हेरिएंट अन् किंमतकंपनीने BYD सील तीन प्रकारांमध्ये लॉन्च केली आहे. त्याचा पहिला प्रकार डायनॅमिक आरडब्ल्यूडी आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 41 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. दुसरा प्रकार प्रीमियम RWD आहे, ज्याची किंमत 45.70 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंट परफॉर्मन्स AWD ची किंमत 53.15 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. हे सर्व प्रकार त्यांच्या बॅटरी क्षमता, ड्रायव्हिंग रेंज आणि तंत्रज्ञान वैशिष्ट्यांवर आधारित आहेत.

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरchinaचीनcarकार