शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

BYD भारतात आणखी तीन इलेक्ट्रिक कार आणण्याच्या तयारीत, जाणून घ्या काय आहे प्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 18:10 IST

BYD Electric Cars : मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी येत्या काही दिवसांत भारतात तीन नवीन कार लाँच करण्याची योजना आखत आहे.

नवी दिल्ली : चीनमधील प्रमुख इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी BYD साठी भारत महत्त्वाची बाजारपेठ बनत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच भारतात आपला पोर्टफोलिओ वाढवण्याची योजना आखत आहे. दरम्यान, येत्या काही वर्षांत कंपनी आपल्या नवीन कार भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्ट्सनुसार, चीनी इलेक्ट्रिक कंपनी BYD लवकरच भारतात आणखी नवीन कार आणू शकते. 

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी येत्या काही दिवसांत भारतात तीन नवीन कार लाँच करण्याची योजना आखत आहे. यासह, कंपनीला पुढील तीन वर्षांत देशातील 85 टक्के इलेक्ट्रिक कार मार्केट कव्हर करायचे आहे. याशिवाय, कंपनी भारतात विस्तारावरही काम करत आहे. त्यामुळे येत्या काही काळात भारत जपानपेक्षाही मोठी बाजारपेठ म्हणून उदयास येऊ शकतो, असा विश्वास कंपनीला आहे.

इलेक्ट्रिक कंपनी BYD देशात इलेक्ट्रिक SUV Atto 3 द्वारे ARAI कडून होमोलोगेशन सर्टिफिकेट मिळविण्यावर काम करत आहे. हे सर्टिफिकेट मिळाल्यानंतर 2500 युनिट्सच्या आयातीवरील निर्बंध हटवले जातील. दरम्यान, देशामध्ये उत्पादित किंवा आयात केलेल्या सर्व वाहनांसाठी सरकारने निर्दिष्ट केलेल्या नियमांनुसार रस्त्याच्या योग्यतेसाठी वाहने प्रमाणित करण्याची प्रक्रिया म्हणजे होमोलोगेशन आहे.

कसा आहे पोर्टफोलिओ?कंपनी BYD ने अलीकडेच भारतात नवीन इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. कंपनीने लक्झरी इलेक्ट्रिक सेडान कार BYD Seal फेब्रुवारी 2024 मध्ये 41 लाख रुपये किमतीत लाँच केली आहे. BYD सध्या भारतात तीन कार ऑफर करते. यापैकी एक सेडान Seal आहे, तर दुसरी एसयूव्ही Atto3 आणि E6 आहे. तर आगामी काळात सी लायन, टँग आणि डॉल्फिन सारख्या कारही भारतीय बाजारपेठेत आणल्या जाऊ शकतात.

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहनcarकार