शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

BYD e6 इलेक्ट्रिक एमपीव्ही लाँच, सिंगल चार्जवर 520 किमी रेंज, टॉप स्पीड 130 किमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 16:15 IST

BYD e6 ELECTRIC MPV : या कारमध्ये सिंगल फ्रंट-एक्सल माउंटेड इलेक्ट्रिक मोटरसह 71.7 kWh ची लिथियम-आयन बॅटरी आहे, जी जास्तीत जास्त 95 PS पॉवर आणि 180Nm चा पीक-टॉर्क जनरेट करू शकते.

नवी दिल्ली : BYD ही चिनी कार उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने इलेक्ट्रिक कार e6 ELECTRIC MPV भारतात लाँच केली आहे. ही एक खाजगी कार आहे, जी सर्वसामान्यांच्या वापरासाठी लाँच करण्यात आली आहे. गेल्या वर्षी BYD E6 EV फक्त एक व्यावसायिक कार म्हणून बाजारात लाँच करण्यात आली होती. या कारचे GL आणि GLX असे दोन व्हेरिएंट आहेत. या कारच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, BYD e6 EV ची सुरुवातीची किंमत 29.15 लाख रुपये आहे.

या कारमध्ये सिंगल फ्रंट-एक्सल माउंटेड इलेक्ट्रिक मोटरसह 71.7 kWh ची लिथियम-आयन बॅटरी आहे, जी जास्तीत जास्त 95 PS पॉवर आणि 180Nm चा पीक-टॉर्क जनरेट करू शकते. तसेच, या कारचा कमाल वेग ताशी 130 किलोमीटर असणार आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार एकदा चार्ज केल्यानंतर 520 किमी पर्यंत प्रवास करू शकते. डीसी फास्ट चार्जिंगमुळे 35 मिनिटांत 30 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल आणि 90 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. या कारच्या दुसऱ्या व्हेरिएट GLX मध्ये 40 kW वॉल-माउंटेड AC फास्ट चार्जरचा ऑप्शन देखील आहे परंतु तो चार्ज करण्यासाठी 2 तास लागतील.

BYD e6 चे फीचर्सBYD e6 MUV एक पाच सीटर कार आहे. ज्यामध्ये LED DRL, लेदर सीट्स, 6-वे अॅडजस्टेबल ड्रायव्हर आणि फ्रंट पॅसेंजर सीट्स, इन-बिल्ट नेव्हिगेशन, CN95 एअर-ब्लूटूथ आणि 10.1 चे रोटेटेबल टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम बसविण्यात आले आहे, जे वायफायला कनेक्ट केले जाऊ शकते. या कारमध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमची सुविधा देखील देण्यात आली आहे. कंपनी या कारसोबत 8 वर्षे किंवा 50,0000 किलोमीटरची बॅटरी वॉरंटी देत ​​आहे.

टॅग्स :AutomobileवाहनElectric Carइलेक्ट्रिक कार