शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

Corbett EV : एकदा चार्ज केल्यानंतर धावणार 200 किमी, Boom Motors ची इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 10:41 IST

Boom Corbett EV launched in India: कंपनी आजपासून म्हणजेच 12 नोव्हेंबर 2021 पासून नवीन कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंग सुरू करणार आहे.

नवी दिल्ली : बूम मोटर्सने देशात नवीन कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटर (EV) लाँच केली आहे, जी भारतातील सर्वात टिकाऊ स्कूटर असल्याचा दावा केला जात आहे. कंपनीने या नवीन इलेक्ट्रिक टू-व्हीलरची किंमत 89,999 रुपये ठेवली आहे. तसेच, ही स्कूटर बाजारात इतर बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटरला टक्कर देणार आहे. 

कंपनी आजपासून म्हणजेच 12 नोव्हेंबर 2021 पासून नवीन कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंग सुरू करणार आहे. कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटरला 2.3 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी एकदा चार्ज केल्यानंततर 200 किमीपर्यंत धावू शकते. या बॅटरीला दुप्पट करून 4.6 kWh करण्याच्या पर्याय ग्राहकांना देण्यात आला आहे.

कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये डिटेचेबल बॅटरी देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनीचा दावा आहे की, या स्कूटरचा चार्जर घरातील कोणत्याही सॉकेटवर लावला जाऊ शकतो. ही नवीन स्कूटर ताशी 75 किमी वेगाने चालवता येते. कॉर्बेट इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल असाही दावा केला जात आहे की, इलेक्ट्रिक स्कूटर 5 वर्षांच्या EMI सह खरेदी केली जाऊ शकते. 

कंपनीचे म्हणणे आहे की, कॉर्बेटइलेक्ट्रिक स्कूटर केवळ 1,699 रुपये प्रति महिना EMI सह खरेदी केली जाऊ शकते. बूम मोटर्स या स्कूटरच्या चेसीवर 7 वर्षांची वॉरंटी आणि बॅटरीवर 5 वर्षांची वॉरंटी देत ​​आहे. बूम मोटर्सचे सीईओ अनिरुद्ध रवी नारायणन म्हणाले की, "हवामानातील बदल हे सध्या आपल्या सर्वांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे आणि भारतातील प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण असलेल्या ‘वाहनांच्या प्रदूषणावर’ मात करणे हे आमचे ध्येय बनले आहे." 

बूम मोटर्सबद्दल अनिरुद्ध रवी नारायणन म्हणाले, "गेल्या 2 वर्षांपासून बूम मोटर्सची संपूर्ण टीम सातत्याने काम करत आहे, त्यामुळे हे वाहन विक्रमी वेळेत बाजारात दाखल झाले आहे. आम्ही कोईम्बतूर येथे उत्पादन प्रकल्प उघडला आहे ज्याची क्षमता वार्षिक 1 लाख स्कूटक तयार करण्याची क्षमता आहे. आम्ही या प्लांटमध्ये शेकडो लोकांना रोजगारही दिला आहे."

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनAutomobileवाहन