भारतातील दिग्गज सिंगर शंकर महादेवन यांनी एक नवी इलेक्ट्रिक लक्झरी कार खरेदी केली आहे. MG ची ही कार भारतातील एकमेव इलेक्ट्रिक MPV आहे. महादेवन यांनी ही कार मेटल ब्लॅक कलरमध्ये खरेदी केली आहे. MG M9 ची एक्स-शोरूम किंमत ६९.९० लाख रुपये एवढी आहे.
किती पॉवरफूल आहे MG M9 MPV? -एमजी एम९ इलेक्ट्रिक एमपीव्ही ही भारतात केवळ एकाच, 'प्रेसिडेन्शिअल लिमो' या टॉप व्हेरियंटमध्ये लाँच झाली आहे. ही कार ९० kWh बॅटरी पॅकसह येते, जी सिंगल चार्जवर ५४८ किलोमीटरची जबरदस्त रेंज देते. हिच्या पॉवरचा विचार करता, हिचे पॉवर आउटपुट २४५ PS तर टॉर्क ३५० Nm आहे. यात V2V आणि V2L (दुसऱ्या गाड्या किंवा उपकरणे चार्ज करण्याचे) तंत्रज्ञानही आहे.
असं आहे इंटीरिअर -एमजी एम९ चे केबिन एवढे प्रिमियम आहे की, कुणीही हिला, 'चालते फिरते हॉटेल' म्हणेल. हिचे केबीन कॉग्नॅक आणि ब्लॅक ड्युअल टोन थीममध्ये तयार करण्यात आले आहे. यात ब्रश्ड ॲल्युमिनियम आणि वुड फिनिशचा वापर आहे. यात १६-व्या इलेक्ट्रिक ॲडजस्टमेंटसह 'कॅप्टन सीट्स' देण्यात आले आहे, जे हिटिंग, व्हेंटिलेशन आणि मसाज सुविधांसह आहे.
कारमध्ये १२-स्पीकर जेबीएल साउंड सिस्टीम -या कारमध्ये १२-स्पीकर जेबीएल साउंड सिस्टीम, १२.२३-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, ३६०° कॅमेरा, लेव्हल-२ ADAS आणि मागील प्रवाशांसाठी डिस्प्लेसारखे फीचर्स आहेत, जे या कारला '५-स्टार हॉटेलचा प्रायव्हेट लाऊंज' असा अनुभव देतात. यामुळेच ही कार आता सेलिब्रिटींची नवी पसंती बनत आहे.
Web Summary : Singer Shankar Mahadevan acquired a black MG M9, an electric MPV. It boasts a 548km range, massage seats, premium interiors, JBL sound, and advanced safety features, making it a '5-star hotel' on wheels.
Web Summary : गायक शंकर महादेवन ने एक ब्लैक एमजी एम9 खरीदी, जो एक इलेक्ट्रिक एमपीवी है। इसमें 548 किमी की रेंज, मसाज सीट, प्रीमियम इंटीरियर, जेबीएल साउंड और उन्नत सुरक्षा सुविधाएँ हैं, जो इसे पहियों पर '5-सितारा होटल' बनाती है।