शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

BMW X3 M40i : भारीच...! 8 गिअरची कार लॉन्च; 4.9 सेकंदात घेते 100kmph ची स्पीड, 5 लाखात होईल तुमची!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 20:27 IST

कंपनीने 5 लाख रुपयांत हिची बुकिंग देखील सुरू केली आहे. अर्थात 5 लाख रुपयांतच आपण ही कार बुक करू शकता...

 बीएमडब्ल्यूने (BMW) भारतामध्ये आपले X3 एसयूव्हीचे स्पोर्टी व्हर्जन लॉन्च केले आहे. या व्हर्जनला कंपनीने BMW X3 M40i नाव दिले आहे. यात पॉवरफुल इंजिनसह आकर्षक डिझाइन देण्यात आले आहे. ही कार भारतात कंप्लिटली बिल्ट युनिट (CBU) स्वरूपात आणली जाईल. कंपनीने 5 लाख रुपयांत हिची बुकिंग देखील सुरू केली आहे. अर्थात 5 लाख रुपयांतच आपण ही कार बुक करू शकता. हिची आजची सुरुवातीची किंमत 86.50 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) एवढी आहे. विशेष म्हणजे ही कार मर्यादित संख्येतच भारतीय बाजारात आणली जाईल.

कशी आहे BMW X3 M40i - ही SUV M340i सेडानच्या इंजिनने सुसज्ज आहे. हे इंजिन 3.0 लिटर, 6 सिलिंडर इन-लाइन पेट्रोल इंजिन आहे. या इंजिनची पॉवर 355 बीएचपी एवढी आहे आणि पीक टॉर्क 500 एनएम एवढा आहे. यात 8-स्पीड ऑटोमॅटिक स्टेपट्रॉनिक स्पोर्ट ट्रान्समिशन आहे. जे पॅडल शिफ्टर्ससह येते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, केवळ 4.9 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रति तास एवढा स्पीड धारण करण्याची या कारची क्षमता आहे, तसेच हिची टॉप स्पीड 250 किमी प्रति तास एवढी आहे, असा दावा बीएमडब्ल्यूने केला आहे.

बीएमडब्ल्यू X3 M40i स्पोर्ट्स व्हर्जन एम स्पोर्ट पॅकेजसह येते. ही कार M-स्पेशल किडनी ग्रिल, हेडलाइट्स, विंग मिरर आणि डुअल-टोन, 20-इंचांच्या अलॉय व्हीलसह येते. ही कार पांढऱ्या आणि काळ्या रंगांच्या पर्यायांसह उपलब्ध होईल. हिच्या इंटीरिअरमध्ये कार्बन फायबरचा वापर करण्यात आला आहे. जो पूर्णपणे मोटर स्पोर्ट 'M' थीमवर बेस्ड आहे. या कारसोबत M लेदर स्टिअरिंग व्हील, M कलर्समध्ये काँट्रास्ट स्टिचिंग, अॅम्बिएंट लायटिंग आणि 3-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलसारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. या कारमध्ये मेमोरी फंक्शन, पॅनोरमिक ग्लास रूफ आणि वेलकम लाइट कारपेट सारख्याही सुविधा असतात.

एक्स3 मध्ये 12.3 इंचांचे टचस्क्रीन, 12.3 इंचांचे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस चार्जिंग, एम्बिएंट लायटिंग, क्लायमेट कंट्रोल, हेड-अप डिस्प्ले सारख्या सुविधाही आहेत. या शिवाय, या कारमध्ये अॅडप्टिव्ह सस्पेंशन, व्हेरिएबल स्पोर्ट स्टिअरिंग, परफॉरमन्स कंट्रोल डिफरेंशिअल लॉक आणि एम स्पोर्ट ब्रेक सारखी वैशिष्ट्येही असतात. या सुविधा देऊन या कारला स्पोर्टी बनविले जाते.

टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यूAutomobileवाहनcarकार