शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
2
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
3
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सतारा टोल रोड प्रोजेक्ट
4
Video : उत्तराखंडमधील चमोलीत मध्यरात्री ढगफुटी! थरालीत कहर, अनेक घरं ढिगाऱ्याखाली; लोकही बेपत्ता!
5
एकावर एक बोनस शेअर देणार HDFC Bank, रेकॉर्ड डेट येत्या काही दिवसांत; गुंतवणूक करणं योग्य ठरेल?
6
फडणवीस-शिंदे-पवारांची 'वर्षा' बंगल्यावर दीडतास खलबते; तीन पक्षांमधील समन्वयावर चर्चा
7
कुठे मिळेल सर्वाधिक व्याज? बँक FD vs पोस्ट ॲाफिस RD; पाहा ५ वर्षाचा संपूर्ण हिशोब, कोण आहे खरा किंग?
8
'माझ्या जीवाला धोका, अनुचित प्रकार घडल्यास सपा जबाबदार' महिला आमदाराचं अखिलेश यादव यांना पत्र
9
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
10
डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?
11
हरित इंधनात रूपांतर करण्यासाठी बेकरींना एक वर्षाची मुदतवाढ नाही; १२ बेकरींचा अर्ज फेटाळला
12
यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवात माजी राष्ट्रपती कोविंद मुख्य अतिथी
13
‘चाकरमानी’ नव्हे तर आता ‘कोकणवासीय’ म्हणावे; अजित पवारांचे निर्देश, लवकरच शासन परिपत्रक
14
१८ वर्षे असते राहु महादशा, ‘या’ राशींना लॉटरी लागते; श्रीमंती-सुबत्ता लाभते, कल्याणच होते!
15
‘बेस्ट पतपेढी’ अपयशानंतर सामंतांनी दिला राजीनामा; पराभव का झाला ते कारणही सांगितलं
16
असं आहे 'बिग बॉस १९'चं घर! पाहा लिव्हिंग रूमपासून गार्डन एरियापर्यंतचे खास फोटो
17
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
18
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
19
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
20
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी

BMW C 400 GT: भारतातील सर्वात महागडी स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि खासियत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 17:53 IST

BMW C 400 GT: पॉवरफुल इंजिन या प्रीमियम स्कूटरमध्ये 350cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळू शकते

नवी दिल्ली :  बीएमडब्ल्यू मोटरराड इंडियाने (BMW Motorrad India) मंगळवारी आपली नवीन C 400 GT प्रीमियम मॅक्सी-स्कूटर भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे.  BMW C 400 GT Maxi Scooter ची सुरूवातीची एक्स-शोरूम किंमत 9.95 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान, सध्या  C 400 GT स्कूटर भारतातील सर्वात महागडी स्कूटर बनली आहे. (BMW C 400 GT launched in India, prices start at ₹9.95 lakh)

बीएमडब्ल्यू ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पावाह यांनी सांगितले की,"सर्व नवीन BMW C 400 GT चे लाँच भारतातील शहरी मोबिलीटी सेगमेंटमध्ये एका नवीन युगाची सुरुवात करते. या प्रगतिशील आणि चपळ मध्यम आकाराच्या स्कूटरला शहर आणि लांब टूरिंग डेस्टिनेशनपर्यंत सहज पोहोचण्यासाठी डिझाइन केले आहे. शहरात फिरणे असो, ऑफिसला जाणे असो किंवा वीकेंड टूरचा आनंद घेणे असो - नवीन BMW C 400 GT राइडचा पूर्ण आनंद घेण्यासाठी योग्य साथीदार आहे."

पॉवरफुल इंजिनBMW C 400 GT मध्ये पॉवरफुल इंजिन या प्रीमियम स्कूटरमध्ये 350cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळू शकते. जे सीव्हीटी ट्रान्समिशनसह येते. हे इंजिन 33.5bhp पॉवर आणि 35Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. यामध्ये राईड-बाय-वायर-थ्रॉटल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि राइडिंग मोड यासारखी अनेक फीचर्स मिळणार आहे.

मस्क्युलर बॉडी याचबरोबर, BMW C 400 GT ला मस्क्युलर बॉडी पॅनेलसह संपूर्ण मॅक्सी-स्कूटर बॉडी किट देण्यात आली आहे. यामध्ये उंच विंडस्क्रीन, पुल-बॅक हँडलबार, एक मोठे स्टेप्ड सीट, ड्युअल फूटरेस्ट, फुल-एलईडी लाइटिंग, कीलेस इग्निशन, हीटेड ग्रिप्स, हीटेड सीट, एबीएस, अँटी-थेफ्ट अलार्म सिस्टम आणि एक ब्लूटूथ-इनेबल्ड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांचा समावेश आहे.

(Hero Pleasure+ XTec : हिरोची नवीन स्कूटर लाँच; ब्लूटूथसह कॉल, SMS अलर्टसह अनेक फीचर्स, जाणून घ्या किंमत...)

टॅग्स :Automobileवाहनmotercycleमोटारसायकलbusinessव्यवसायBmwबीएमडब्ल्यू