जर तुम्ही ईव्ही चालवत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केरळ राज्य वीज नियामक आयोगाने ईव्ही चार्जिंगबाबत मोठा बदल केला आहे. केरळ राज्य वीज नियामक आयोगाने ईव्ही चार्जिंगबाबत मोठा बदल केला आहे. आता तुम्हाला रात्री चार्जिंगसाठी ३०% जास्त पैसे द्यावे लागतील.
दिवसा चार्ज केल्यास पैसे वाचतील
नवीन नियमानुसार, ईव्ही चार्जिंग आता दोन टाइम झोनमध्ये विभागले आहे.
सोलर पिरियड (सकाळी ९ ते दुपारी ४)
जर तुम्ही या काळात तुमची ईव्ही चार्ज केली तर तुम्हाला ३०% कमी दर भरावा लागेल. म्हणजे जर पूर्वी चार्जिंगसाठी १०० रुपये लागत होते, तर आता फक्त ७० रुपये लागतील.
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर
नॉन सोलर (दुपारी ४ ते सकाळी ९)
नॉन सोलर वेळेत चार्ज केल्यास ३०% जास्त दर आकारला जाईल. म्हणजेच आता तेच शुल्क १३० रुपये असेल.
हा नियम कुठे लागू होईल?
हे नवीन दर फक्त सार्वजनिक ईव्ही चार्जिंग स्टेशनवर लागू होतील. घरी चार्जिंग करणाऱ्यांवर याचा परिणाम होणार नाही. हा नियम सध्या केरळ राज्यात लागू करण्यात आला आहे, परंतु भविष्यात इतर राज्यांमध्येही लागू केला जाऊ शकतो.
चार्जिंग कंपन्यांसाठीही मोठे आव्हान
सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या चार्जिंग स्टेशनना आता एका नवीन आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. जर ते दिवसा सौरऊर्जेचा पूर्णपणे वापर करू शकले नाहीत, तर त्यांचे नुकसान होऊ शकते.
यामुळे आता गाड्या दिवसा चार्जिंग करणे परवडणार आहे. स्मार्ट प्लॅनिंग करून तुम्ही चार्जिंगवर बरेच पैसे वाचवू शकता. दिवसा चार्जिंग स्वस्त आहे, परंतु बरेच लोक सोयीसाठी रात्री चार्ज करतात, आता त्यांना त्यांच्या सवयी बदलाव्या लागणार आहेत.