शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

24 kmpl पर्यंत मायलेज देणार्‍या देशातील सर्वात स्वस्त टॉप 3 कार, जाणून घ्या सविस्तर....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 14:04 IST

Best mileage cars : जर तुम्ही सर्वात कमी किमतीत मायलेज देणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या अशा टॉप 3 कारचे डिटेल्स, ज्या 4 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतील.

नवी दिल्ली : भारतातील मध्यमवर्गीयांमध्ये सर्वोत्कृष्ट मायलेज असलेल्या कारची मागणी सर्वाधिक आहे. त्यामुळे या 5 सीटर हॅचबॅक कार कमी किमतीत अधिक मायलेज घेऊन येतात. जर तुम्ही सर्वात कमी किमतीत मायलेज देणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या अशा टॉप 3 कारचे डिटेल्स, ज्या 4 लाखांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येतील.

Top 3 Best Mileage Cars

Maruti Alto 800  मारुती अल्टो 800 ही देशातील सर्वात कमी किमतीची कार आहे, जी कमी किंमतीव्यतिरिक्त साइज आणि मायलेजमुळे मध्यमवर्गीयांमध्ये खूप पसंत केली जाते. अल्टो 800 ची सुरुवातीची किंमत 3.54 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप मॉडेलसाठी 5.13 लाख रुपयांपर्यंत जाते. या कारचे चार ट्रिम बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मारुती अल्टो 800 मध्ये, कंपनीने 796 सीसीचे 0.8 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 48 पीएस पॉवर आणि 69 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स उपलब्ध आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही कार 22.05 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते. हे मायलेज ARAI द्वारे प्रमाणित आहे.

Datsun Redi-Go देशातील दुसरी सर्वात कमी किमतीची कार डॅटसन रेडी गो आहे. जी थेट मारुती Alto 800 ला टक्कर देते. दिल्लीमध्ये या कारची एक्स-शोरूम किंमत 3.84 लाख रुपयांपासून सुरू होते आणि ती 4.96 लाख रुपयांपर्यंत जाते. डॅटसन रेडी गोमध्ये 799 सीसीचे 3 सिलिंडर इंजिन दिले आहे. हे इंजिन 53.64 बीएचपी पॉवर आणि 72 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. मायलेजबाबत कंपनीचा दावा आहे की, ही कार एक लिटर पेट्रोलवर 20.71 किलोमीटर प्रति लिटर मायलेज देते. 

Maruti Alto K10देशातील तिसरी सर्वात स्वस्त कार मारुती अल्टो K10 आहे, जी चार ट्रिमसह बाजारात उपलब्ध आहे. या कारची किंमत 3.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.95 लाख रुपयांपर्यंत जाते. या किंमती (एक्स-शोरूम, दिल्ली) आहेत. मारुती अल्टो K10 मध्ये 998 सीसीचे 1 लीटर ड्युअल जेट पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 67 पीएस कमाल पॉवर आणि 89 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. मारुती अल्टो K10 चे ARAI प्रमाणित मायलेज 24.39 kmpl आहे.

टॅग्स :MarutiमारुतीAutomobileवाहन