शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 13:55 IST

Bajaj Pulsar NS400 : कंपनीने या बाईकची बुकिंगही लाँचसोबतच सुरू केली आहे.

नवी दिल्ली : बजाज ऑटोच्या (Bajaj Auto) नवीन पल्सरची (Pulsar) अनेक दिवसांपासून ग्राहक वाट पाहत होते. अखेर आज ग्राहकांची प्रतीक्षा संपली आहे. कंपनीने बजाज पल्सर NS400 (Bajaj Pulsar NS400) रेन, ऑफ-रोड, रोड आणि स्पोर्ट अशा चार वेगवेगळ्या राइडिंग मोडसह लाँच केली आहे. तसेच, कंपनीने या बाईकची बुकिंगही लाँचसोबतच सुरू केली आहे.

Bajaj Pulsar NS400 मध्ये ग्राहकांना ड्युअल-चॅनल ABS आणि 5 स्टेप अ‍ॅडजस्टेबल लीव्हर्स देण्यात आले आहेत. बजाज पल्सरच्या या नवीन मॉडेलमध्ये अ‍ॅडव्हान्स फूल-डिजिटल इन्स्ट्रुमेंट पॅनल, बजाज राइड कनेक्ट ॲपद्वारे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल्स अँड टेक्स्ट अलर्ट्स, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन आणि यूएसबी चार्जिंग पोर्ट यांसारखी अनेक फीचर्स आहेत.

किंमतबजाज ऑटोने पल्सरच्या या नवीन मॉडेलची किंमत 1 लाख 85 हजार रुपये (एक्स-शोरूम) निश्चित केली आहे. विशेष म्हणजे या बाईकची प्रास्ताविक किंमत आहे. म्हणजेच मर्यादित कालावधीसाठी या किमतीत बाईक विकली जाईल. दरम्यान, कंपनी प्रास्ताविक किमतीत ही बाईक किती दिवसांपर्यंत विकणार आहे, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही.

बुकिंगऑफिशियल लाँचिंगसोबत बजाजने ग्राहकांसाठी पल्सरच्या नवीन मॉडेलचे बुकिंगही सुरू केले आहे. जर तुम्हाला पल्सरचे नवीन मॉडेल घ्यायचे असेल तर तुम्ही 5,000 रुपये बुकिंग रक्कम भरून ही बाईक तुमच्या नावावर बुक करू शकता. बजाज ऑटोच्या अधिकृत साइट व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या घराजवळील बजाज डीलरकडे जाऊनही बाईक बुक करू शकता.

टॉप स्पीड आणि इंजिनकंपनीने बजाज पल्सरचे नवीन मॉडेल 154 किमी प्रतितास या टॉप स्पीडसह बाजारात आणले आहे. या बाईकमध्ये 373 सीसी सिंगल सिलेंडर लिक्विड कूल्ड इंजिन आहे, जे 8800rpm वर 40ps पॉवर जनरेट करते. याशिवाय, हे 6500rpm वर 35Nm टॉर्क जनरेट करते. तसेच, ही बाईक तुम्हाला 6 स्पीड गिअरबॉक्ससह मिळेल.

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलbikeबाईक