शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 1000 रुपयांत बुक करा Bajajची 'ही' बाइक, पुढील आठवड्यापासून डिलिव्हरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 15:25 IST

Bajaj Pulsar F250 & N250 : नवीन बजाज पल्सर 250 चे (Pulsar 250) ऑनलाइन बुकिंग अजून सुरू व्हायचे आहे. मात्र कंपनीच्या डीलरशिप स्टोअरमध्ये बाइकचे बुकिंग सुरू झाले आहे.

नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात बजाज ऑटोने (Bajaj Auto) आपल्या लोकप्रिय मोटरसायकल पल्सरचे (Pulsar) दोन व्हेरिएंट Pulsar N250 आणि Pulsar F250 लॉन्च केले आहेत. Pulsar ब्रँड अंतर्गत कंपनीची ही सर्वाधिक इंजिन क्षमतेची बाइक आहे. 125cc ते 250cc पर्यंतच्या बाइक्स Pulsar ब्रँड अंतर्गत येतात.

नवीन बजाज पल्सर 250 चे (Pulsar 250) ऑनलाइन बुकिंग अजून सुरू व्हायचे आहे. मात्र कंपनीच्या डीलरशिप स्टोअरमध्ये बाइकचे बुकिंग सुरू झाले आहे. यासाठी ग्राहकांना 1,000 ते 5,000 रुपयांपर्यंत टोकन रक्कम भरावी लागेल.

Pulsar 250 ची टेस्ट ड्राइव्हजर तुम्हाला कंपनीच्या Pulsar 250 च्या दोन व्हेरिएंटपैकी कोणत्याही व्हेरिएंटची टेस्ट ड्राइव्ह घ्यायची असेल, तर डिलिव्हरी सुरू होताच ग्राहकांना त्याचा आनंद घेता येईल. कंपनी पुढील आठवड्यापासून Pulsar 250 च्या दोन्ही व्हेरिएंटची डिलिव्हरी सुरू करू शकते.

Pulsar 250 ची डिलिव्हरीबजाज ऑटोने 10 नोव्हेंबरपासून नवीन पल्सर 250 च्या दोन्ही प्रकारांची डिलिव्हरी सुरू करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या पल्सर मॉडेलची डिलिव्हरी 20 वर्षांपूर्वी याच दिवशी सुरू झाली.

नवीन Pulsar 250 ची खासियतBajaj Auto ने आपल्या नवीन Bajaj Pulsar 250 चे दोन्ही मॉडेल पूर्णपणे रि-डिझाइन केले आहे. स्पोर्ट बाइक सेगमेंटमध्ये मजबूत उपस्थिती असलेली ही बाइक कंपनीने नवीन ट्यूबलर फ्रेम चेसिसवर विकसित केली आहे. याला समोरील बाजूस टेलिस्कोपिक सस्पेंशन देण्यात आले आहे. मागील बाजूस, कंपनीने नवीन मोनोशॉक सस्पेंशन युनिट दिले आहे.

ऑइल कूल्ड DTS-i इंजिन Bajaj Pulsar 250 मध्ये कंपनीने DTS-i 4 स्ट्रोक ऑइल कूल्ड इंजिन दिले आहे. ते BS-6 अनुरूप आहे. हे 24.5 PS ची कमाल पॉवर आणि 21.5 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या बाइकमध्ये कंपनीने 5-स्पीड ट्रान्समिशन मोड दिला आहे आणि सेमी-डिजिटल मीटर दिले आहे आणि सोबत टॅकोमीटर नीडल देखील ठेवली आहे.

नवीन Bajaj Pulsar 250 ची किंमत कंपनीने नवीन Bajaj Pulsar 250 बाइक 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सेगमेंटमध्ये ठेवली आहे. Bajaj Pulsar N250 मॉडेलची दिल्लीत एक्स-शोरूम किंमत 1,38,000 रुपये आणि बजाज Bajaj Pulsar F250 साठी 1.40,000 रुपये असेल.

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलAutomobileवाहन