शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

'या' आहेत बेस्ट Electric Scooters; ९५ किलोमीटरची रेंज आणि प्रदूषणाचंही टेन्शन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 17:40 IST

सध्या देशात वाढत आहे Electric वाहनांची मागणी. पाहा कोणत्या आहेत या स्कूटर्स आणि किती आहे किंमत.

ठळक मुद्देसध्या देशात वाढत आहे Electric वाहनांची मागणी. सध्या अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांना देत आहेत पसंती.

सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तुलनेनं ही वाहनं पेट्रोल डिझेलच्या वाहनांपेक्षा महाग असली तरी त्यांचा इंधना इतका पुढे खर्च नसतो. यामुळे पर्यावरणाचीही हानी टळते. आपण पाहूया कोणत्या आहेत देशात बेस्ट 5 इलेक्ट्रिक स्कूटर्स.

Ather 450Xही सर्वोत्तम मेड इन इंडिया स्कूटर्सपैकी एक आहे. यामध्ये पॉवरफुल मोटरसह शार्प डिझाईन आणि कनेक्टेड टेक्नॉलॉजी मिळते. यात 6kW इलेक्ट्रिक मोटर आहे, जी 8 bhp पॉवर आणि 26 एनएम टॉर्क देते. स्कूटरचा टॉप स्पीड 80 किमी प्रतितास आहे. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर ८५ किमीपर्यंत जाऊ शते. या स्कूटरचा टॉप स्पीड 85 kmph इतका आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 1.47 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

Bajaj Chetakही स्कूटर दिसण्यात अतिशय स्टायलिस्ट आहे तसंच याची क्वालिटीही उत्तम आहे. यामध्ये DRL सोबत LED हेडलँप, फुल डिजिटल LCD इन्स्टुमेंट आणि स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसारखे फीचर्स मिळतात. बजाज चेतकमध्ये 3.8 kW इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 5bhp पॉवर आणि 16.2Nm पीक टॉर्क जनरेट करतं. ही स्कूटर एकदा चार्ज केल्या 95 किमीची रेंज देते. या याची एक्स शोरूम पुणे किंमत 1.42 लाख रूपये इतकं आहे.

TVS iQubeTVS iQube ही स्कूटर बजाज चेतकला टक्कर देणारी बाईक आहे. या इलेक्ट्रिक बाईकमध्ये ऑल LED लायटिंग, TFT इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी, युएसबी चार्जिंग, बूट लाईटही देण्यात आलं आली आहे. यामध्ये 4.4kW ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली असून ती 6bhp ची पॉवर आणि 140Nm चा टॉर्क जनरेट करते. एका चार्जमध्ये ही स्कूटर 75 किलोमीटरपर्यंत जाते. याची एक्स शोरूम दिल्ली किंमत 1.08 लाख रूपयांपर्यंत आहे.

Hero OptimaHero Optima ही कंपनीची सर्वाधिक विक्री झालेल्या प्रोडक्टपैकी एक आहे. यामध्ये कंपनीनं डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर, रिजनरेटीव्हग ब्रेकिंग, एलईडी हेडलँप, अँटी थेफ्ट अलार्म आणि पोर्टेबल बॅटरी दिली आर्हे. यामध्ये 1.2 kW BLDC इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली असून ती 1.34bhp पॉवर जनरेट करते. तसंच या स्कूटरचा सर्वाधिक वेग हा 42 किमी प्रति तास आहे. एका चार्जमध्ये ही स्कूटर 82 किलोमीटर पर्यंत जाते. हीरो ऑप्टीमाची एक्स शोरूम दिल्ली किंमत 61,640 रूपये आहे.

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेडIndiaभारत