शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Bajaj Chetak नवी प्रीमिअम एडिशन लाँच, इलेक्ट्रीक स्कूटमध्ये मिळणार जबरदस्त फीचर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 13:53 IST

बजाज ऑटोने गुरुवारी देशांतर्गत बाजारात त्यांची एकमेव इलेक्ट्रीक स्कूटर बजाज चेतकचं नवीन प्रीमियम एडिशन लाँच केलं.

देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी बजाज ऑटोने गुरुवारी देशांतर्गत बाजारात त्यांची एकमेव इलेक्ट्रीक स्कूटर बजाज चेतकचं नवीन प्रीमियम एडिशन लाँच केलं. कंपनीनं ही स्कूटर आपल्या नवीन इलेक्ट्रीक व्हेइकल प्रोग्राम अंतर्गत लाँच केली आहे. नवीन प्रीमियम एडिशन बजाज चेतक लाँच करून, सध्याच्या मॉडेलची किंमत देखील अपडेट करण्यात आलीये. आता बजाज चेतक रेंजची सुरुवातीची किंमत 1,21,933 रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. तर प्रीमियम एडिशन बजाज चेतकची किंमत 1,51,910 रुपये (एक्स-शोरूम, बंगळुरू) पासून सुरू होते.

बजाज ऑटोने या स्कूटरच्या लाँचसोबतच नवीन ईव्ही प्रोग्रॅमची घोषणाही केली आहे. दुचाकी इलेक्ट्रीक वाहन पुरवठा साखळीची पुनर्रचना करण्यात आली आहे आणि हा नवीन ईव्ही कार्यक्रम प्रमुख विक्रेत्यांच्या सहकार्यानं तयार करण्यात आला आल्याची माहिती बजाज ऑटोनं प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटलंय. कंपनीचा दावा आहे की हा नवीन कार्यक्रम दरमहा चेतकच्या 10,000 पेक्षा जास्त युनिट्सच्या उपलब्धतेची खात्री देत ​​नाही तर खर्च देखील कमी करतो. ज्यामुळे चेतक अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचू शकेल.

प्रीमिअम एडिशनमध्ये काय खास?या नवीन एडिशनमध्ये चेतकला प्रीमियम लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता ही स्कूटर तीन नवीन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामध्ये मॅट कोर्स ग्रे, मॅट कॅरिबियन ब्लू आणि सॅटिन ब्लॅक यांचा समावेश आहे. याशिवाय, कंपनीने स्कूटरमध्ये काही अतिरिक्त फीचर्स देखील जोडले आहेत. यात ऑल कलर एलसीडी कन्सोल जे वाहनाची माहिती सोयीस्करपणे दाखवतं. तर दुसरीकडे प्रीमियम टू-टोन सीट्स, बॉडी कलरचे रियर व्ह्यू मिरर, सॅटिन ब्लॅक ग्रॅब रेल आणि मॅचिंग पिलियन फूटरेस्ट कास्टिंग हे स्कूटरचा क्लासिक लूक आणखी वाढवतात. हेडलॅम्प केसिंग, ब्लिंकर्स आणि सेंट्रल ट्रिम एलिमेंट्स आता चारकोल ब्लॅक थीमने सजवलेले आहेत.

दरम्यान, स्कूटरचं बुकिंग सुरू करण्यात आलं असून याची डिलिव्हरी एप्रिल महिन्यापासून केली जाणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय. याचं बुकिंग तुम्ही डिलरशीप किंवा ऑनलाइन वेबसाइटच्या माध्यमातून करता येऊ शकेल.

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइलelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर