शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

कोणालाही जमलं नाही, ते बजाज कंपनीनं करून दाखवलं; भारताचं नाव जगात गाजवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2021 20:24 IST

कोरोना संकटातही बजाज ऑटोची झेप

नवी दिल्ली: कोरोना काळात जवळपास सगळ्याच कंपन्यांना मोठा आर्थिक फटका बसला. कित्येक कंपन्यांचं अर्थकारण अद्यापही रुळावर आलेलं नाही. मात्र बजाज ऑटोनं कोरोना संकटातही दमदार कामगिरी केली आहे. एक लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह बजाज जगातील सर्वात मूल्यवान दुचाकी कंपनी ठरली आहे. १ जानेवारीला बजाज कंपनीच्या समभागाची किंमत नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (एनएसई) ३ हजार ४७९ रुपयांपर्यंत पोहोचली. त्यामुळे कंपनीच्या बाजाप भांडवलानं १ लाख कोटींचा टप्पा पार केला. हा आकडा ओलांडणारी बजाज ही जगातील पहिली कंपनी आहे.बजाज कंपनीच्या विक्रीत डिसेंबर २०२० मध्ये ११ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. कंपनीनं एका पत्रकाच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली. 'डिसेंबर २०१९ मध्ये बजाज ऑटोनं ३ लाख ३६ हजार ५५ वाहनं विकली होती. डिसेंबर २०१९ मध्ये हाच आकडा ३ लाख ७२ हजार ५३२ वर गेला. या काळात कंपनीची देशांतर्गत विक्री १ लाख ५३ हजार १६३ वरून १ लाख ३९ हजार ६०६ वर घसरली. मात्र त्याचवेळी निर्यात वाढली,' अशी आकडेवारी कंपनीनं दिली आहे. जगातील इतर कोणतीही कंपनी सध्या तरी बजाज ऑटोच्या आसपासदेखील नाही.कंपनीनं मोटारसायकल श्रेणीकडे विशेष लक्ष दिलं असून वेगळी रणनीती वापरून लोकांचा विश्वास कमावल्याचं बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी सांगितलं. लोकांचा विश्वास जिंकल्यानंच बजाज कंपनी जगातील सर्वाधिक मूल्यवान कंपनी ठरली आहे. जगातील प्रख्यात कंपन्या वापरत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करतो. त्याचमुळे बजाज जगात दुचाकींच्या बाबतीत अव्वल ठरली आहे, असं बजाज पुढे म्हणाले. 

टॅग्स :bajaj automobileबजाज ऑटोमोबाइल