देशात कार आणि एसयूव्हीवरील जीएसटी दरात कपात जाहीर झाल्यानंतर, जगुआर लँड रोव्हर इंडियाने (जेएलआर इंडिया) एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यात कंपनीने आपल्या सर्व मॉडेल्सवर मिळणाऱ्या डिस्काउंटसंदर्भात माहिती दिली आहे. सुधारित किंमती 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहेत. संबंधित यादीनुसार, जीएसटी सुधारणेनंतर जगुआर लँड रोव्हरच्या कार प्रचंड स्वस्त झाल्या आहेत. लँड रोव्हर डिफेंडरवर 18.60 लाखांपर्यंतची सूट मिळत आहे.
किती कमी झाल्या जेएलआर कारच्या किंमती? -मॉडेल कमी झालेल्या किंमतीरेंज रोवर (Range Rover) 30.4 लाखस्पोर्ट (Sport) 19.7 लाखडिफेंडर (Defender) 18.6 लाखडिस्कवरी (Discovery) 9.9 लाखव्हेलार (Velar) 6 लाखइव्होक (Evoque) 4.6 लाखडिस्कव्हरी स्पोर्ट (Discovery Sport) 4.5 लाख
वरील सर्व किंमती संबंधित मॉडल्सवरील किंमतीतील कमाल कपात आहे. कंपनीने जीएसटी कपात व्हेरिअंटनुसार केली आहे. यानुसार, रेंजरोव्हरच्या किंमतीतील कमाल कपात 30.4 लाख तर डिफेंडरच्या किंमतीतील कमाल कपात 18.60 लाखपर्यंत कमी झाल्या आहेत.
नवे कार जीएसटी दर - लहान कारवर यापूर्वी लागणारा 28% जीएसटी कमी करून 18% करण्यात आला आहे, यामुळे करात 10% ची घट झाली आहे. ही कपात ज्या कारची इंजिन क्षमता पेट्रोल कारसाठी 1,200 सीसी आणि डिझेल कारसाठी 1,500 सीसीपेक्षा कमी आहे, अशा 4,000 मिमीपेक्षा कमी लांबीच्या कारांवर लागू आहे. तर, 4,000 मिमीपेक्षा जास्त लांबीच्या कारवर यापूर्वी 28% जीएसटी लागायचा, ज्यावर इंजिन क्षमतेच्या आधारावर 22% अतिरिक्त उपकर लागायचा, यामुळे प्रभावी कर 50% पर्यंत व्हायचा. मात्र, आता 1,500 सीसीपेक्षा जास्त इंजिन क्षमतेच्या कार 40% च्या एकसमान कर स्लॅब अंतर्गत येतात. महत्वाचे म्हणजे, इलेक्ट्रिक वाहनांवरील जीएसटी 5% एवढाच आहे.