शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
3
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
4
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
5
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
6
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
7
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
8
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
9
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
10
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
11
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
12
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
13
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
14
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
15
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
16
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
17
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
18
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
19
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
20
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप

वर्ष संपता संपताच मारुतीचा मोठा धमाका! नव्या अंदाजात सादर केली खिशाला परवडणारी कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2022 12:15 IST

ऑटो एक्सपर्ट या कारला हॅचबॅकच मानते. पण कंपनीने या कारला आपल्या अधिकृत वेबसाइटवर एसयूव्ही सेक्शनमध्ये जागा दिली आहे.

वर्ष 2022 आता संपत आले आहे. यातच मारुती सुझुकीने आपली प्रसिद्ध कार S-Presso नव्या अंदाजात सादर केली आहे. कंपनीने आपल्या या कारचे फोटोदेखील आधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. ही एक लिमिटेड अॅडिशन एस-प्रेसो कार आहे. जी तिच्या टॉप मॉडेलवर बेस्ड असण्याची शक्यता आहे. अभी इस कार से जुड़े कुछ डिटेल्स सामने आए हैं और बहुत जल्द ही इसकी कीमत का भी खुलासा किया जाएगा.

नवी Maruti S-Presso Xtra मध्ये काय आहे खास -ऑटो एक्सपर्ट या कारला हॅचबॅकच मानते. पण कंपनीने या कारला आपल्या अधिकृत वेबसाइटवर एसयूव्ही सेक्शनमध्ये जागा दिली आहे. सध्या, नव्या S-Presso Xtra मध्ये काही एक्स्ट्रा फीचर्स आणि अपडेट येणे अपक्षित आहे. हिचा फोटो पाहून अंदाज लावला जाऊ शकतो, की हिच्या एक्सटीरिअरमध्ये फ्रंट स्किड प्लेट, डोर क्लॅडिंग, व्हील आर्क क्लॅडिंग सारखे अपग्रेड दिसू शकतात. याशिवाय, हिच्या इंटीरिअरमध्ये डोर पॅनल आणि डॅशबोर्ड इत्यादीवर रेड इंसर्ट देण्यात येईल. कंपनी हिच्या अपहोल्स्ट्री आणि मॅट्समध्येही बदल करेल.

या कारच्या इंजिन मेकॅनिझममध्ये कुठल्ही बदल होणार नाही. या कारमध्येही स्टँडर्ड मॉडेल प्रमाणेच 1.0-लिटरचे के-सीरीज ड्युअल-जेट इंजिन असेल. हे इंजिन आयडियल स्टॉर्ट-स्टॉप टेक्नॉलॉजीसह येते. हे इंजिन 65.7 bhp ची पॉवर आणि 89 Nm चा टॉर्क जेनरेट करेल. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सला जोडले गेले आहे. येणाऱ्या काळात ही कार (AGS) ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्येही उपलब्ध असेल.

महत्वाचे म्हणजे, हिचे स्टँडर्ड मॉडेल पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही व्हेरिअँटमध्ये  उपलब्ध आहे. हिचे पेट्रोल मॉडेल 21.4 किलोमीटर प्रतिलीटर तर सीएनजी मॉडेल 32.73 किलोमीटर प्रतिकिग्रॅपर्यंत मायलेज देते. रेग्युलर मॉडेलमध्ये 7 इंचाचे ट्च स्क्रिन इंफोटेंमेन्ट सिस्टिम, डिजिटल इंस्ट्रूमेन्ट क्लस्टर, पॉवर विंडो, किलेस एंट्री सारख्या सुविधा मिळतात. याशिवाय सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारला डुअल एअरबॅग, रिअर पार्किंग सेंसर, स्पीड अलर्ट सिस्टिम, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD) तसेच, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS) आणि फ्रंट सीट-बेल्ट रिमाइंडर देण्यात आले आहे.

अशी असेल किंमत - सध्या Maruti S-Presso Xtra च्या किंमतीसंदर्भात काहीही सांगणे अवघड आहे. मात्र, नव्या अपग्रेडनंतर, या कारची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा अधिक असू शकते, असा अंदाज बांधला जात आहे. सध्याच्या मॉडेलची किंम 4.25 लाख रुपयांपासून ते 6.10 लाख रुपयांपर्यंत जाते. ही कार बाजारात प्रामुख्याने टाटा टिअॅगो आणि रेनो क्विड सारख्या मॉडेल्सना टक्कर देईल. 

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुतीAutomobileवाहन