शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

स्कूटर थांबवताना दोन्ही ब्रेकचा हळूवार व एकाचवेळी वापर करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 12:23 IST

सुरक्षित ब्रेकींग स्कूटरला करायचे असेल तर दोन्ही ब्रेकचा वापर एकाचवेळी करावा. विनाकारण जोरात ब्रेक लीव्हर दाबण्याऐवजी हळूवार आवश्यक तसा वेग कमी करीत ब्रेकींग करावे.

ठळक मुद्देस्कूटरचा वेग, पीकअप यामध्ये मोठा फरक पडला आहे. त्यामुळे मुख्य नियंत्रण हा जो प्रकार असतो, तो बदललेला आहे.नव्या स्कूटरचा वेग कमी करण्यासाठी केवळ ब्रेक हा एकमेव महत्त्वाचा घटक कामी येतो.नव्या स्कूटर्समध्ये पूर्वीच्या स्कूटरच्या तुलनेत झालेले फरक लक्षात घेण्यासारखे आहेत.

डाव्या हाताने क्लच दाबत गीयर टाकण्याची पद्धत असलेल्या स्कूटर्स आता भारतात तरी उत्पादनातून बाहेर फेकल्या गेल्या आहेत. सुलभपणे चालवता येतील अशा ऑटोगीयरच्या स्कूटर्स आता भारतीय रस्त्यांवरून दिसत आहेत. या स्कूटर्सना स्कूटी वा स्कूटरेट अशा नावानेही ओळखले जाते. त्यांची चालवण्याची पद्धत ही पूर्वीच्या मॅन्युअल गीयरच्या स्कूटरपेक्षा भिन्न आहे. त्यांची बॉडी वेगळ्या स्वरूपाची आहे. पूर्वीच्या स्कूटर्सचे इंजिन एका बाजूला असायचे, त्यामुळे त्या स्कूटर चालवताना त्यांच्या समतोल नीट साधावा लागत असे, अर्थात ते अंगवळणी पडलेले असायचे.

स्कूटरचा वेग, पीकअप यामध्ये मोठा फरक पडला आहे. त्यामुळे मुख्य नियंत्रण हा जो प्रकार असतो, तो बदललेला आहे. नव्या स्कूटर्समध्ये पूर्वीच्या स्कूटरच्या तुलनेत झालेले फरक लक्षात घेण्यासारखे आहेत. त्यामुळे स्कूटर चालवताना त्या स्कूटरच्या नियंत्रणामध्ये बराच फरक आहे. स्कूटरची बॉडी ट्यूब्युलर व बहुतांशी पत्रा वापरण्याऐवजी आऊटरबॉडीला फायबर वा प्लॅस्टिकचा वापर केल्याने वजन कमी झाले आहे. इंजिनाचे वजन व आकारही पूर्वीच्या तुनलेत कमी,कार्बोरेटरचाही आकार लहान झाला आहे. किंबहुना काही तंत्र बदलले आहे. टायर रुंदीला लहान आहे. या नव्या स्कूटर्सचा सारा बदल लक्षात घेता क्लच दाबून मॅन्युअल गीयर टाकण्याची सुविधा नसल्याने वेगामध्ये असताना स्कूटरवर वेग कमी करण्यासाठी असणारा एक घटक कमी झाला आहे.

नव्या स्कूटरचा वेग कमी करण्यासाठी केवळ ब्रेक हा एकमेव महत्त्वाचा घटक कामी येतो. यामुळे स्कूटर मुळात नियंत्रित वेगातच चालवावी. लहान टायर्समुळे रस्त्यांवरील खड्ड्यांचा, उंचवट्याचा असणारा अडथळा, त्यामुळे स्टिअरिंग रॉ़वरही पकड मजबूत ठेवावी लागते. रुंदीला कमी असल्याने ओलसरपणा रस्त्यावर असले तर किंवा लोखंडी झाकणांवरून जाताना स्कूटर स्लीप व्हायची शक्यता असते. ब्रेकचा वापर करताना डाव्या हाताचा लीव्हर हा मागील व उजव्या हाताचा लीव्हर हा पुढील ब्रेकसाठी दाबावा लागतो. अनेक जण डाव्या हाताचा ब्रेक केवळ वापरतात. मुळात या स्कूटरला दोन्ही ब्रेक दाबून वेग नियंत्रित करणे अपेक्षित आहे. यासाठी काही स्कूटर्सना एका लीव्हरवर दोन ब्रेक लावण्याची सोयही केलेली आहे.

काही स्कूटरना डिस्क ब्रेकही देण्यात आले आहेत. डिस्क व ड्रम ब्रेक यांमधील फरक समजून घ्यावा व त्यानंतर ब्रेकचा वापर किमान करीत व जोरदारपणे न लावता योग्य दाब देत हळूवारपणे लावणे योग्य असते. तातडीसाठी अकस्मात आलेला धोका टाळण्यासाठी लावलेला ब्रेक एखादवेळी समजू शकतो. मात्र शक्यतो स्कूटरसाठी दोन्ही ब्रेक्सचा वापर हळूवारपणे करावा. वायरवर हे ब्रेक ऑपरेट होत असतात व विनाकारण जोराद ब्रेक दाबून स्कूटर थांबवण्याची सवय असले तर ती वायर सतत तशा प्रकारच्या वापरण्याने लवकर खराब होते. तसेच तातडीने जोरात ब्रेक लावण्याची सवय ही स्कूटर स्कीट होण्यासाठीही काहीवेळा घातक ठरू शकते. तेव्हा ब्रेक वापर ही अतिशय महत्त्वाची क्रिया करताना सावधपणे करायला हवी.

टॅग्स :Automobileवाहन