शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
3
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
4
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
5
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
6
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
7
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
8
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
9
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
10
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
11
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
12
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
13
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
14
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
15
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
16
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
17
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
18
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
19
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
20
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

एकच नंबर! आता Apple ची इलेक्ट्रीक कार येणार, विना स्टेअरिंग अन् पॅडलनं चालणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 09:57 IST

Apple Electric Car: आयफोन स्मार्टफोन निर्माती कंपनी Apple आता सेल्फ-ड्रायव्हिंग इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

Apple Electric Car: आयफोन स्मार्टफोन निर्माती कंपनी Apple आता सेल्फ-ड्रायव्हिंग इलेक्ट्रिक कार बनवण्याचा प्रयत्न करत आहे. टायटन असे या प्रकल्पाचे नाव आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनीनं इलेक्ट्रिक कारची योजना २०२६ पर्यंत पुढे ढकलली आहे. ही कार स्टीयरिंग व्हील आणि पेडल्सशिवाय बनवावी अशी कंपनीची इच्छा आहे. अ‍ॅपलच्या व्हिजननुसार ही कार तयार करण्यासाठी कंपनीचे अधिकारी मेहनत घेत आहेत. सध्याचं तंत्रज्ञान पाहता स्टीयरिंग व्हील आणि पेडल्सशिवाय कार बनवणे जवळजवळ अशक्य आहे.

Apple इलेक्ट्रिक कार बनवण्यासाठी आता कंपनी आपल्या अविश्वसनीय स्वप्नांशी थोडी तडजोड करुन नव्या डिझाइनसह पुढे जाण्याचा विचार करत आहे. या डिझाइनमध्ये स्टिअरिंग व्हील आणि पेडल्सचाही समावेश असेल. आगामी कार केवळ महामार्गांवर स्वयंचलित ड्रायव्हिंगला सपोर्ट करेल. सुरुवातीला कंपनीला लेव्हल ५ ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग कार सादर करायची होती. पण कंपनीला यात अद्याप यश मिळू शकलेलं नाही.

Apple कार: ड्रायव्हर खेळेल गेमApple चा टायटन प्रकल्प चार वर्ष जूना आहे. आता हा प्रकल्प कंपनीच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे. मात्र, आगामी काळात आगामी इलेक्ट्रिक कार अ‍ॅपलला चांगला नफा देण्याची शक्यता आहे. अ‍ॅपलला अशी कार बनवायची आहे ज्यामध्ये ड्रायव्हर हायवेवर अगदी बिनदिक्कतपणे चित्रपट पाहणं किंवा गेम खेळू शकतो. त्याच वेळी, गर्दीच्या ठिकाणी, ही कार ड्रायव्हरला मॅन्युअल कंट्रोल घेण्यासाठी वेळीच सावध करेल.

पावरफुल चिप सेटसह येणार Apple Carकंपनी प्रथम उत्तर अमेरिकेत ही कार लॉन्च करणार आहे. यानंतर, कालांतराने कारमध्ये सुधारणा करताना इतर ठिकाणी देखील विक्री केली जाईल. अ‍ॅपलच्या कारला कंपनीच्या पॉवरफुल कॉम्प्युटरचा सपोर्ट मिळेल, ज्याचं कोडनेम डेनाली असणार आहे. ब्लूमबर्गच्या मते, त्याच्या प्रोसेसरची कार्यक्षमता ऍपलच्या सर्वात मजबूत मॅक चिपशी तुलना करता येऊ शकते.

Apple Car: २०२५ मध्ये येईल प्रोटोटाइपसध्या ही चिप अ‍ॅडव्हान्स स्टेजमध्ये असल्याचं सांगण्यात आलं आहे, म्हणजेच त्याचं उत्पादन लवकरच सुरू होऊ शकते. टेस्लाही अशाच प्रकारे प्रयत्न करत आहे. Apple कडे अद्याप ठोस डिझाइन नाही. कार सध्या प्रोटोटाइप टप्प्यात असून तिची चाचणी २०२५ मध्ये केली जाऊ शकते.

टॅग्स :Apple Incअॅपल