शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
2
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
6
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
7
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
8
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
9
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
10
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
11
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
12
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
13
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
14
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
15
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
16
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
17
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
18
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
19
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
20
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'

एअर फिल्टर वेळच्यावेळीच बदलणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 10:26 AM

कारमधील एअर फिल्टर छोटा घटक असला तरी अतिशय गरजेचा व महत्त्वाचा घटक आहे. तो वेळीच तपासणे व योग्यवेळी बदलणे महत्त्वाचे असते. अन्यथा त्यामुळे भवितव्यात नको त्या दुरुस्तीची कटकटही मागे लागू शकते.

ठळक मुद्देकारच्या इंजिनामध्ये हवा जाते तेव्हा त्याबरोबर धुळीचे कण व अन्य सूक्ष्म कचराही जात असतो. तो रोखण्यासाठी एअर फिल्टर हे महत्त्वाचे पण अत्यावश्यक साधन लावले जाते.एअर फिल्टर ही काही कायम राहाणारी वस्तू नाही, ती कालानुसार, तसेच तुम्ही ज्या भागात वाहन चालवीत असता, तेथील वातावरणानुसार धुळीचे वा मातीचे प्रमाण लक्षात घेऊन बदलावी लागणारी ही सामग्री आहे

कारच्या इंजिनामध्ये हवा जाते तेव्हा त्याबरोबर धुळीचे कण व अन्य सूक्ष्म कचराही जात असतो. तो रोखण्यासाठी एअर फिल्टर हे महत्त्वाचे पण अत्यावश्यक साधन लावले जाते. कापड, कागद किंवा गॉझ याचा वापर या फिल्टरसाठी केला जातो. एअर फिल्टर हा कचरा इंजिनामध्ये जाण्यापासून रोखतो. अर्थात पूर्णपणे काही हा कचरा एअर फिल्टरमुळे रोखला जातो असेही नाही. मात्र याची कारच्या कार्बोरेटरमधून जाणाºया हवेमध्ये असलेल्या धुळीकणांना रोखण्यासाठी अतिशय गरज असते. इंधनामधून ही हवा इंजिनाप्रत जाण्यासाठी गरजेची असते. त्यामुळे हवा त्यादृष्टीने तेथे खेचली जात असते. अशावेळी हवेमधून विविध प्रकारचे घटक सूक्ष्म व काहीशा जाड स्वरूपातही इंधनात जाू शकतात, ते रोखले जाणे गरजेचे असते. त्यमुळे सुमारे ९९ टक्के धुळीकण या एअर फिल्टरमुळे रोखले जातात.

एअर फिल्टर ही काही कायम राहाणारी वस्तू नाही, ती कालानुसार, तसेच तुम्ही ज्या भागात वाहन चालवीत असता, तेथील वातावरणानुसार धुळीचे वा मातीचे प्रमाण लक्षात घेऊन बदलावी लागणारी ही सामग्री आहे. मात्र किती वारंवार ती बदलावी लागते, ते त्या वातावरणावरही अवलंबून आहे, जेथे तुमचे वाहन वा कार सातत्याने वापरात आहे. रवाहनांच्या देखभालीच्या वेळापत्रकामध्ये कार निर्मात्या कंपन्यांकडूनही एअर फिल्टर बदलण्याबाबत काहीशी मतभिन्नता दिसते. मात्र साधारणपणे ३० ते ४५ हजार किलोमीटर अंतर कापल्यानंतर हे फिल्टर बदलणे गरजेचे आहे. एअर फिल्टिर जसा जसा अधिक कचरा जमा करीत राहील तो जर स्वच्छ केला गेला नाही, किंवा तो एअर फिल्टर बदलला गेला नाही, तर त्यामुळे इंधनामध्ये हवा जाण्याचे प्रमाणही कमी होईल. इंजिनामध्ये ही हवा पोहोचणेही कमी होईस. त्यामुळे तुमच्या वाहनाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ शकतो. खराब झालेला एअर फिल्टर जास्त वापरणे त्यामुळेच अयोग्य आहे. अनेकदा एअर फिल्टर कधी बदलावा ते समजत नाही. त्यामुळे प्रत्येकवेळी कार गॅरेजला नेल्यानंतरमेकॅनिकला दाखवली की मग आपण त्याला विचारतो की विचारीत नाही, त्यावर तो फिल्टर बदलला जातो किंवा जातही नाही. आपले लक्ष या गोष्टीवर असणेही गरजेचे आहे.ठळक मुद्देसाधारणपणे खराब एअर फिल्टरमुळे काय होते व काय अुभव येतो ते लक्षात घ्यावे.तुमच्या मायलेजवर परिणाम होतोइंजिनाचा आवाज काहीसा वेगळा वाटतोइंजिनसंबंधातील सर्व्हिस लाइट पेटतो व तुम्हाला सूचित करतोहॉर्सपॉवर कमी वाटतेकाहीवेळा मफलरमधून काळा धूर सोडला जातो.पेट्रोलचा वास येतो.कारचा वापर तुम्ही जास्त करीत नसला तर एअर फिल्टरचे आयुष्य साहजिकच जास्त असेल हे लक्षात घ्या. कार जितकी वापराल व ती ज्या वातावरणात वापराल तेथे तेथे कारमध्ये खेचल्या जाणाºया हवेमधून एअर पिळ्टरवर कचरा, धुळीकण जमा होणारच आहेत. ते किती प्रमाणात जमा होतात, त्याबाबत खराब धुलूग्रस्त हवामान, रस्ते हे घटकही कारणीभूत असतात. त्यामुळे चांगल्या रस्त्यांवर कार चालवली जात असेल. स्वच्छ वातावरणात कार चालवली जात असेल, तर एअर फिल्टरचे आयुष्य साहजिक जास्त असणार आहे. अर्थात एअर फिल्टर ही कायम पुरणारी वस्तू नाही. ती बदलणे व योग्यवेळी बदलणे नेहमी गरजेचे आहे. त्यामुळे एअर फिल्टरकडे साधारण दर तीन ते ५ हजार किलोमीटर झाल्यावर सर्व्हिसिंगच्यावेळी लक्ष ठेवा, मेकॅनिककडेही त्याबाबत विचारणा करा. इंधनामध्ये स्वच्छ आॅक्सिजन मिश्रित होणे गरजेचे आहे व त्याचे काम हा फिल्टर करत असतो. त्यामुळे इंजिनामध्ये होणारे या इंधनाचे ज्वलन सुयोग्य होते. तसेच इंजिनामध्ये या हवेद्वारे काही कचरा जाणे व तो सतत जात राहाणे यामुळे इंजिनाचेही नुकसान कालांतराने होऊ शकते. तेव्हा होणाºया संभाव्य अनावश्यक दुरुस्तीऐवजी एअर फिल्टर, आॅइल फिल्टर, योग्यवेळी तेल बदलणे या बाबींवर प्रत्येक कारचालक व मालकाने लक्ष ठेवले पाहिजे. तुमच्या कारचे आयुष्य व आरोग्य यावर्वलंबून असते, हे लक्षात घेतले पाहिजे. 

टॅग्स :Automobileवाहन