शहरं
Join us  
Trending Stories
1
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
2
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
5
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
6
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
7
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
8
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
9
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
10
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
11
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
12
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
13
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
14
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
15
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
16
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
17
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
18
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
19
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
20
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश

OLA इलेक्ट्रिक स्कूटरनंतर आता ई-कारची पहिली झलक; जाणून घ्या जबरदस्त फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 17:13 IST

ओलाची ही इलेक्ट्रिक कार तुम्हाला टेस्ला मॉडेल एस आणि मॉडेल 3 ची आठवण करून देते.

नवी दिल्ली - OLA इलेक्ट्रिक आपली पहिली इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात आणणार आहे. इलेक्ट्रिक स्कूटर सेगमेंटमध्ये वर्चस्व निर्माण केल्यानंतर कंपनीने इलेक्ट्रिक कारही लॉन्च करण्याची घोषणा केली होती. आता यंदा पहिल्यांदाच OLA इलेक्ट्रिक कारचा पहिला फोटो समोर आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारची पेटंट इमेज ओलाने इंटरनेटवर लीक केली आहे, ज्यामध्ये कारच्या लुक आणि डिझाइनशी संबंधित सर्व माहिती समोर येत आहे.

ओला इलेक्ट्रिक कारचा जो फोटो समोर आला आहे तो पाहून ती अजूनही प्राथमिक टप्प्यावर असल्याचे दिसते. हे पूर्णपणे उत्पादन तयार मॉडेल नाही. कंपनीने या कारची घोषणा करताना एक टीझर जारी केला होता, ज्यामध्ये लाल रंगाच्या कार OLA चे बॅजिंग आणि कारची शार्प लाईन्स दाखवली होती. बातमीच्या सुरुवातीला जो फोटो आहे पण ही पेटंट इमेज त्याच्यापेक्षा खूपच वेगळी दिसते.

नवीन इमेजच्या आधारे बोलायचे झाल्यास, ओलाची ही इलेक्ट्रिक कार तुम्हाला टेस्ला मॉडेल एस आणि मॉडेल 3 ची आठवण करून देते. ही पारंपारिक सेडान सिल्हूट आहे ज्याच्या मागील बाजूस कूप सारखा रुफ मिळतो. बॉडी पॅनेल्सला स्मूथ बनवण्यासोबतच एयरोडायनमिक सुधारित केले आहेत. कारचे मागील चाक बरेच मागे ठेवले गेले आहे, ज्यामुळे कारचा व्हीलबेस नक्कीच वाढेल. कंपनी मोठा बॅटरी पॅक वापरण्याच्या स्वरूपात याचा फायदा घेऊ शकते. 

पारंपारिक इलेक्ट्रिक कारप्रमाणे, यात फ्रंट ग्रिल नाही. हेडलॅम्प असेंब्ली बंपरच्या अगदी वर आहे आणि त्यात स्लिम, होरिजेंटल लँम्प आहेत जे एलईडी टेललाइटसह देऊ शकतात. एलईडी लाईट दोन्ही हेडलाइट्सना स्पर्श करणारे संपूर्ण बोनट कव्हर करतात. कंपनीने मागच्या वेळी टीझरमध्ये ग्लॉस रूफ दाखवले असले तरी या कारमध्ये ड्युअल-टोर रूफ दिले जात आहे. कारच्या मागील भागाबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

ड्रायव्हिंग रेंजबाबत काय आहे रिपोर्ट?ओलाच्या आगामी इलेक्ट्रिक कारशी संबंधित तांत्रिक माहिती अजूनही खूप मर्यादित आहे. पण याला 70-80kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला जाण्याची शक्यता आहे ज्याची रेंज 500 किमी पेक्षा जास्त आहे. ओलाने यापूर्वी असेही म्हटले आहे की, आगामी इलेक्ट्रिक कारला केवळ 4 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास गती देण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. ही देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार असेल. ताज्या माहितीनुसार, पुढील वर्षभरात ही इलेक्ट्रिक कार बाजारात आणण्याची योजना आहे. 

टॅग्स :OlaओलाElectric Carइलेक्ट्रिक कार