बुलेटच्या या बाईक्समध्ये येणार एबीएस; नवी स्पेशल बुलेट 350 लाँच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 19:50 IST2018-08-29T19:47:16+5:302018-08-29T19:50:24+5:30
रॉयल एन्फिल्डच्या बुलेटचे Classic 350 हे खास मॉडेल लाँच करण्यात आले. बुलेटची एक्स-शोरुम किंमत 1.62 लाख ठेवण्यात आली आहे.

बुलेटच्या या बाईक्समध्ये येणार एबीएस; नवी स्पेशल बुलेट 350 लाँच
युवाईच्या मनात धकधक करणारी फटफटी म्हणजेच रॉयल एन्फिल्डच्या बुलेटचे Classic 350 हे खास मॉडेल लाँच करण्यात आले. या बुलेटची एक्स-शोरुम किंमत 1.62 लाख ठेवण्यात आली आहे. या बुलेटला खासकरून एअरफोर्स आणि लष्कराच्या जवानांना समर्पित केले गेले आहे. या बुलेटमध्ये एबीएस ही सुरक्षा प्रणाली बसविण्य़ात आली आहे.
Inspired by the Royal Enfields in service and those who ride them. #MadeLikeAGunpic.twitter.com/LTsC4Cr4bW
— Royal Enfield (@royalenfield) August 25, 2018
बुलेटने भारतीयांच्या मनावर गारुड केले आहे. बुलेट जरी शान वाढविणारी असली तरीही बरेचजण तिचा मुळ सायलेन्सर बदलून मोठा आवाज म्हणजेच फायरिंग देणारा सायलेन्सर लावतात. हे कायद्याने चुकीचे आहे शिवाय ध्वनी प्रदुषणही होते. तसेच वेगात चालविल्याने अचानक ब्रेक लावल्यास घसरण्याची शक्यताही असते. परिवाहन मंत्रालयाने केलेल्या नियमांनुसार पुढील वर्षीपासून नव्या गाड्यांना एबीएस सारखी सुरक्षा प्रणाली देणे बंधनरकारक आहे.
यामुळे बुलेटने Royal Enfield Classic Signals 350 मध्ये ड्युअल चॅनल एबीएस प्रणाली लावली आहे. तसेच गेल्या वर्षी लाँचे केल्या गेलेल्या हिमालयन मध्येही एबीएस प्रणाली लावण्यात येणार आहे. यानुसार हिमालयनचे दोन मॉडेल येणार आहेत. किंमतीमध्ये Royal Enfield Himalayan ABS आणि Sleet ABS मध्ये केवळ दोन हजारांचा फरक आहे. या बाईकची आगाऊ बुकिंगही सुरु झाली आहे.