शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

7 Seater Cars : कमी बजेटमधील 'या' आहेत आलिशान 7 सीटर कार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 16:37 IST

7-Seater Cars at Low Price : मारुतीची ही कार 5-सीटर आणि 7-सीटर पर्यायांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. ही भारतातील सर्वात परवडणारी 7 सीटर कार आहे.

नवी दिल्ली : जर तुमचे कुटुंब मोठे असेल आणि तुम्हाला एकत्र कुठेही जायचे असेल तर अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे एक मोठी 7 सीटर कार असावी, ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण कुटुंबासह प्रवासाचा आनंद घेऊ शकता. देशात अनेक असे लोक आहेत, ज्यांचे कुटुंब मोठे आहे आणि त्यांना 7 सीटर कार खरेदी करायची आहे. मात्र, कमी बजेट असल्यामुळे त्यांना ते शक्य होत नाही. तुम्हालाही असेच वाटत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कारण, मार्केटमध्ये अशा अनेक 7 सीटर कार आहेत, ज्यांची किंमत खूपच कमी आहे. तसेच, या कारमध्ये जबरदस्त मायलेजही मिळतो. या कारबद्दल जाणून घेऊया...

मारुती सुझुकी इको मारुतीची ही कार 5-सीटर आणि 7-सीटर पर्यायांमध्ये बाजारात उपलब्ध आहे. ही भारतातील सर्वात परवडणारी 7 सीटर कार आहे. त्यामुळे याची मोठ्या प्रमाणात विक्री होते. ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनावर धावू शकते. तर त्याचे कमाल मायलेज 26 किमी प्रति किलो आहे. या कारच्या 5-सीटर व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 5.10 लाख रुपये आहे. तर त्याच्या 7-सीटर व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 5.42 लाख रुपयांपासून सुरू होते.

रेनॉल्ट ट्राइबररेनॉल्टची ही एमपीव्ही कार देशात खूप लोकप्रिय आहे. कारला 1.0 लीटर 3 सिलिंडर, Natural Aspirated पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 72 पीएस पॉवर आणि 96 एनएम टॉर्क जनरेट करते. कारमध्ये 6-वे अॅडजस्टेड ड्रायव्हर सीट, प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, स्टीयरिंग-माउंटेड कंट्रोल्स, 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम ही फीचर्स आहेत. यासोबतच या कारमध्ये 84 लीटर बूट स्पेसही देण्यात आली आहे. या 7 सीटर कारची एक्स-शोरूम किंमत 5.92 लाख रुपये आहे.

मारुती सुझुकी एर्टिगामारुती सुझुकीची एर्टिगा ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कारपैकी एक आहे. या कारमध्ये माईल्ड हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज 1.5 लिटर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. यात पेट्रोलसोबत सीएनजीचाही पर्याय आहे. हे इंजिन 103 PS पॉवर आणि 137 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार सीएनजीवर 26 किमी प्रति किलो मायलेज देते. या कारची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 8.41 लाख रुपये आहे.

टॅग्स :Automobileवाहनcarकार