शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

Kawasaki KLX450R 2022: कावासाकीची नवीन डर्ट बाईक भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 14:57 IST

2022 Kawasaki KLX450R launched in India : नवीन बाईकची डिलिव्हरी 2022 च्या पहिल्या महिन्यात सुरू होणार आहे.

कावासाकी इंडियाने (Kawasaki India) देशात नवीन 2022 KLX450R डर्ट बाईक लाँच केली आहे. नवीन ऑफ-रोडर मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत 8.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या किमतीत ही बाईक मागील मॉडेलपेक्षा 50,000 रुपयांनी महाग झाली आहे.

डिलिव्हरी नवीन बाईकची डिलिव्हरी 2022 च्या पहिल्या महिन्यात सुरू होणार आहे. नवीन KLX450R आपल्या आधीच्या मॉडेलप्रमाणेच CBU (पूर्णपणे तयार केलेले युनिट) म्हणून भारतात येत आहे.

काय झाले बदल?वार्षिक अपडेटसह, कावासाकी KLX450R बाइक नवीन लाइम ग्रीन कलर ऑप्शनसह सादर करण्यात आली आहे. यासोबतच बाईकमध्ये नवीन डिकेल्स देण्यात आले आहेत. कंपनीचा दावा आहे की, त्यांनी लो-एंड टॉर्कसाठी पॉवरट्रेनमध्ये किरकोळ अपडेट देखील केले आहेत. बाईकसाठी केलेल्या इतर अपडेट्समध्ये सस्पेंशन देखील बदलले आहे.

इंजिन आणि पॉवरनवीन Kawasaki KLX450R ला पूर्वीप्रमाणेच 449cc, सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन मिळते. हे इंजिन आता उत्तम लो-एंड टॉर्क देते आणि त्याच 5-स्पीड गिअरबॉक्ससोबत येते. पॉवरट्रेन हलक्या वजनाच्या पॅरॉमीटर फ्रेममध्ये ठेवले आहे.

सस्पेंशनसस्पेंशनसाठी, बाईकच्या पुढच्या बाजूला अपसाइड-डाऊन फॉर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक आहे. ब्रेकिंगसाठी, दोन्ही बाजूंना पेटल-प्रकारचे डिस्क ब्रेक वापरण्यात आले आहेत. बाइकला रेंटल अॅल्युमिनियम हँडलबार स्टँडर्ड आणि एक छोटा डिजिटल कन्सोल देखील मिळतो.

येणार तीन नवीन बाईकदरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी कावासाकीने 2022 पूर्वी तीन नवीन इलेक्ट्रिक आणि हायब्रिड बाईक बाजारात आणण्याची आपली योजना जाहीर केली आहे. कंपनीने दावा केला आहे की, 2035 पर्यंत त्यांची बहुतेक मॉडेल्स इलेक्ट्रिक आणि हायब्रिडवर स्विच करण्याची त्यांची योजना आहे.

टॅग्स :bikeबाईकAutomobileवाहनKawasaki Bikeकावासाकी बाईक