शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Mahindra Thar मध्ये तांत्रिक बिघाड, कंपनीनं डिझेल गाड्या मागवल्या परत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 6:01 PM

Mahindra Thar Recalled: जाणून घ्या काय आहे कारण

ठळक मुद्दे७ डिसेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीत उत्पादन करण्यात आलेल्या गाड्या मागवल्या परतकोणत्याही शुल्काविना करण्यात येणार दुरूस्ती

Mahindra Thar Recalled: देशातील प्रमुख वाहन उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रानं गुरूवारी Mahindra Thar च्या डिझेल व्हेरिअंटच्या काही गाड्या परत मागवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीनं तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १ हजार ५७७ गाड्या परत मागवल्या. तांत्रिक बिघाड दुरूस्त केल्यानंतर त्या गाड्या त्यांच्या मालकांकडे पुन्हा सुपुर्द करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षी नज्या गाड्यांचं उत्पादन करण्यात आलं त्या गाड्या पुन्हा मागवण्यात आल्या आहेत. पुन्हा मागवण्यात आलेल्या गाड्यांच्या कॅमशॉफ्ट मध्ये काही समस्या उद्भवू शकतात असं सांगण्यात आलं. सप्लार्स प्लांटमधील मशीन्समध्ये झालेल्या गडबडीमुळे ही समस्या उद्भवली असल्याचं कंपनीनं म्हटलं.ज्यांच्या गाड्या मागवण्यात आल्या आहेत त्यांच्या मालकांशी लवकरच संपर्क साधला जाणार असून आवश्यक ती दुरूस्ती करून त्या गाड्या पुन्हा त्यांच्या मालकांकडे सोपवण्यात येतील. यासाठी गाड्यांच्या मालकांना आपल्या जवळच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये आपली गाडी आणावी लागणार आहे. तसंच त्या ठिकाणी गाड्या तपासून आवश्यक स्पेअर पार्ट्स वगैरे बदलण्यात येतील. तसंच यादरम्यान करण्यात आलेल्या बदलांसाठी कंपनी कोणतंही शुल्क आकारणार नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात कंपनीनं आपल्या Mahindra Thar चं नेक्स्ट जनरेशन मॉडेल लाँच केलं होतं. या नव्या एसयूव्हीला ग्राहकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला होता. लाँच झाल्यानंतर महिन्याभरातच जवळपास साडेसहा हजार गाड्या बुकही झाल्या होत्या. काही दिवसांपूर्वी कंपनीनं आपल्या अन्य गाड्यांसह Mahindra Thar च्या किंमतीतही वाढ केली होती.

टॅग्स :Mahindraमहिंद्राcarकारDieselडिझेल