शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

... तर भरावा लागणार १२,५०० रुपयांचा दंड; वाहन चालवण्यापूर्वी पाहा नियम आणि करू नका चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 22:52 IST

जर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानंतर ट्रॅफिक पोलीस तुमच्यावर कठोर कारवाई करू शकतात.

जर वाहतुकीचे नियम मोडले तर तुम्हाला 12500 रुपयांचा दंडही भरावा लागू शकतो. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. जर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यानंतर ट्रॅफिक पोलीस तुमच्यावर कठोर कारवाई करू शकतात. मोटर व्हेइकल कायद्याच्या कलम 194C नुसार जर तुम्ही दुचाकीवरून तीन जण प्रवास करत असाल तर तुम्हाला 1 हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. याशिवाय आपात्कालिन वाहनाला रस्ता न दिल्यास 193E नुसार 10 हजार रुपयांचा दंड, तर सूर्यास्तानंतर अंधारात गाडीचा लाईट सुरू न ठेवता वाहता चालवल्यास CMVR 105/177 MVA नुसार 1500 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

याशिवाय नुकतेच वाहतूक पोलिसांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत 20 हजार रुपयांचे वाहतूक चालान कापले आहे. अलीकडेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करून गाडीच्या छतावर उभ्या असलेल्या काही तरुणांचा नाचण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओची दखल घेत गाझियाबाद पोलिसांनी एकूण 20 हजार रुपयांचे चालान करून 5 तरुणांना अटक केली होती. गाझियाबाद पोलिसांनीच ही माहिती दिली होती.

कशी पाहाल चालानबाबत माहिती?https://echallan.parivahan.gov.in या वेबसाइटवर जा. चेक चलन स्टेटस हा पर्याय निवडा. तुम्हाला चलन क्रमांक, वाहन क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक (DL) चा पर्याय मिळेल. वाहन क्रमांकाचा पर्याय निवडा. विचारलेली आवश्यक माहिती भरा आणि 'Get Detail' वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या गाडीवर कोणतं चालान आहे का नाही याची माहिती मिळेल.

कसं भराल ऑनलाइन?https://echallan.parivahan.gov.in/ वर जा. चालानशी संबंधित आवश्यक तपशील आणि कॅप्चा भरा. त्यानंतर गेट डिटेल्सवर क्लिक करा. एक नवीन पान उघडेल. त्यावर चालानचे तपशील दिले जातील. तुम्हाला भरायचे असलेले चालान शोधा. चालानासोबतच ऑनलाइन पेमेंटचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. पेमेंट संबंधित माहिती भरा. पेमेंटची कन्फर्म करा. त्यानंतर तुमचं चालान भरलं जाईल.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस