शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

Ather EV Scooter: एथर जोमात! मुंबईत उभारली १० चार्जिंग स्टेशन, कारही चार्ज करा; पहा लोकेशन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 13:14 IST

Ather EV Scooter charging locations in Mumbai: पुढील वर्षीपर्यंत एथर एनर्जी कडून मुंबईतील विविध ठिकाणी ३० फास्ट चार्जिंग पॉईंट्स सुरु करण्यात येणार आहेत. या करता एथर एनर्जी ने पार्क + बरोबर भागीदारी केली असून त्यांच्या कडून मुंबईत इव्ही लोकेशन्स सुरु करण्यात येणार आहेत.

मुंबई : एथर एक्सपिरियन्स सेंटर आणि एथर ४५० एक्सच्या (Ather 450X) मुंबईतील डिलिव्हरीज सुरू केल्यानंतर आता एथर एनर्जी कडून मुंबईत फास्ट चार्जिंग पब्लिक नेटवर्क उभारण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत मुंबईतील १० ठिकाणी चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. (Ather started delevery of 450X electric scooter in Mumbai, also started fast-charging public network on 10 locations.)

पुढील वर्षीपर्यंत एथर एनर्जी कडून मुंबईतील विविध ठिकाणी ३० फास्ट चार्जिंग पॉईंट्स सुरु करण्यात येणार आहेत. या करता एथर एनर्जी ने पार्क + बरोबर भागीदारी केली असून त्यांच्या कडून मुंबईत इव्ही लोकेशन्स सुरु करण्यात येणार आहेत. पार्क + हा स्मार्ट पार्किंग सोल्युशन्स प्रदाता ब्रॅन्ड असून यामध्ये वापरकर्त्यांना पार्किंग शोधणे, स्लॉट बुक करणे आणि डिजिटली पैसे देणे अशा सुविधा प्रदान करतो. एथर एनर्जी कडून सातत्याने अधिक प्रगतीशील अशा कंपन्यांबरोबर करार केले जाणार असून यामुळे ईव्ही मालकांना सोप्या पध्दतीने, रेंजचा त्रास कमी करत ईव्ही वापरणे शक्य होणार आहे. एथर एनर्जी कडून सहकारी गृहनिर्माण संस्था आणि ओनर्स असोसिएशन्स बरोबरही सहकार्य करार केले जाणार असून त्याअंतर्गत एथरचे मालक हे त्यांच्या बिल्डिंग आणि अपार्टमेंट्ससाठी होम चार्जिंग सुविधा सुरू करु शकणार आहेत.

एथर एनर्जीकडून भारतातील १८ शहरांमध्ये १२८ पब्लिक चार्जिंग पॉईंट्सची सुरुवात केली आहे. फास्टचार्जिंग नेटवर्क चा उपयोग हा भारतातील सर्व इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी मालकांकडून केला जाऊ शकतो आणि त्याच बरोबर या सुविधांचा वापर ते सप्टेंबर २०२१ पर्यंत अगदी मोफत करू शकतील. या चार्जिंग नेटवर्क वर नियंत्रण हे एथर ग्रीड अॅपच्या माध्यमातून करण्यात येणार असून यामुळे ईव्ही चे मालक हे लगेच रिअल टाईम तत्वावर जवळचे चार्जिंग स्टेशन शोधणे व त्याची उपलब्धता तपासता येते. ए एनर्जी ने आपल्या वाढीचे लक्ष्य समोर ठेवत ज्या २७ बाजारपेठेत एथर तर्फे २०२१ च्या तिसऱ्या तिमाहीत डिलिव्ही सुरू करण्यापूर्वी ५-६ पॉईंट्स सुरू करण्याची योजना आखली आहे.

कुठे कुठे आहेत चार्जिंग स्टेशन

  1. रूणवाल अॅथेरियम, मुलुंड पश्चिम
  2. सुवा इंटरनॅशनल, अंधेरी पूर्व
  3. क्लब क्वेरिया, बोरिवली
  4. सेलेस्टिया स्पेसेस, शिवडी
  5. ब्ल्यू टोकाई, महालक्ष्मी
  6. काळा घोडा कॅफे, फोर्ट
  7. एथर स्पेस मुंबई, लिकिंग रोड
  8. के स्टार मॉल, चेंबूर
  9. कार्निव्हल सिनेमा आयमॅक्स, वडाळा
  10. लोढा फ्लोरेंझा, गोरेगाव
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनscooterस्कूटर, मोपेड