शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

1 लाख 80 हजार गाड्या मारुती बाेलावणार परत; सुरक्षेसंबंधी त्रुटी असल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 08:37 IST

माेफत दुरुस्ती करून देणार

नवी दिल्ली : भारतातील सर्वात माेठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने १ लाख ८० हजाराहून अधिक वाहने परत मागविण्याची घाेषणा केली. या गाड्यांमध्ये सुरक्षेसंबंधी संभाव्य त्रुटीचा तपास करून ती दूर करण्यात येणार आहे. ही सर्व वाहने पेट्राेलवर चालणारी आहेत.  

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ४ मे २०१८ ते २७ ऑक्टाेबर २०२० या कालावधीत उत्पादन केलेल्या १ लाख ८१ हजार ७५४ गाड्या परत मागविण्यात येणार आहेत. त्यात सियाझ, एर्टिगा, व्हिटारा ब्रीझा, एस-क्राॅस आणि एक्सएल-६ या माॅडेल्सचा त्यात समावेश आहे. या गाड्यांमध्ये सुरक्षेसंबंधी काही त्रुटी आढळून आल्या आहेत. तपासणी केल्यानंतर परिणाम झालेले सर्व सुटेभाग माेफत बदलून देण्यात येतील. याबाबत कंपनीच्या अधिकृत वर्कशाॅपमधून ग्राहकांना संपर्क करण्यात येईल. 

नाेव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून दुरुस्तीची प्रक्रिया सुरू हाेईल, असे कंपनीने म्हटले आहे. ताेपर्यंत ग्राहकांनी पाणी भरलेल्या ठिकाणी प्रवास करू नये, असे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्राॅनिक भागावर पाणी पडणार याची काळजी घेण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे. सेमिकंडक्टर चीपचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे वाहन उत्पादनावर माेठा परिणाम झाला आहे. सप्टेंबरमध्ये सर्वच कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम हाेण्याची शक्यता असून, मारुती सुझुकीला या दुरुस्तीमुळे दुहेरी फटका बसणर आहे. 

आपली गाडी या यादीत आहे का, याची ग्राहक स्वत:देखील माहिती घेऊ शकतात. त्यासाठी कंपनीच्या वेबसाईटवर संबंधित माॅडेलच्या लिंकवर जाऊन चेसिस नंबर टाकल्यास माहिती उपलब्ध हाेईल. चेसिस नंबर वाहन आयडी प्लेटवर एम्बॉस्ड असताे. तसेच वाहनाचे बिल आणि नाेंदणीच्या कागदपत्रांमध्येदेखील नमूद केलेला असताे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन