मेघना ढोके. ‘लोकमतसखी.कॉम’च्या संपादक आहेत. पत्रकार-अनुवाद-लेखक अशी त्यांची ओळख. २५ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. कॉन्फ्लिक्ट रिपोर्टिंग’ हा त्यांच्या वार्तांकनाचा विषय आहे. रिपोर्ताज शैलीत सामाजिक विषयावर संशोधनपर लेखन करतात. याशिवाय क्रिकेट, खाद्यसंस्कृती आणि सिनेमासह पॉप्युलर कल्चरचे सामाजिक परिणाम हे त्यांच्या आवडीचे विषय. आसाम एनआरसीविषयी त्यांनी लिहिलेले ‘मोई कुन? आमी कुन?’ हे पुस्तक गाजले आहे. अरुण साधू शिष्यवृत्ती त्यांना मिळाली होती. अरुणाचल प्रदेश आणि चीन यासंदर्भात लिहिलेल्या ‘जो है, वो है,’ या लेखाला आशिया-पॅसिफिक स्तरावरचा एशियन डेव्हलपमेण्ट बॅँकेचा ‘बेस्ट डेव्हलपमेण्ट जर्नलिस्ट ऑफ द इयर’ म्हणजेच ‘डाजा’ हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचसाठी जपान-टोक्यो येथील कार्यशाळेत उपस्थित राहण्यासाठी विशेष फेलोशिपही मिळाली होती. तसेच अमेरिकन सरकारची ‘इंटरनॅशनल व्हिजिटर लीडरशीप प्रोग्रॅम’ ही विशेष फेलोशिपही मिळालेली असून त्याअंतर्गत ‘मीडिया आणि डेमोक्रसी’ याविषयावरचा अभ्यास त्यांनी केला आहे. पां. वा. गाडगीळ विकासात्मक लेखन पुरस्कारही अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत. म्हणूनही त्यांची पुस्तकं गाजलेली आहेत. आय ॲम अ टॅक्सी, सॅक्रेड लीफ, फेलानी, डेमोक्रॅसीज इलेव्हन-भारतीय क्रिकेटची महान गाथा ही त्यांची काही गाजलेली पुस्तकं आहेत.Read more
कोच निपॉनदा हिमाविषयी बोलताना सांगतात, ‘उसको बस फिनिशिंग लाइन दिखता है, और कुछ नहीं दिखता, वो बोलता है, सर आप सिर्फ टायमिंग बोलो, मै वो टायमिंग लाके दिखाता.’ - जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेच्या 20 वर्षाखालील गटांत 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारतासा ...
मायबाप सरकारचे प्रतिनिधी असलेल्या शासकीय कर्मचार्यांनी जे दिलं ते आपण गोड मानून घ्यायचं हीच आजवरची परंपरा. शासकीय योजनेचा आला पैसा, जिरला पैसा; कुठं जिरला हे गावकर्यांनी सरकारच्या बाशिंद्याना विचारू नये, शासकीय यंत्रणांनीही सांगू नये, अशीच आजवरच ...
टी-ट्वेण्टी महिला आशियाई चॅम्पिअनशिप बांग्लादेशनं जिंकली. बांग्लादेशच्या यशात भारतीय महिलांचा वाटा मोठा आहे. या संघाच्या प्रशिक्षकपदी भारतीय खेळाडू आहेत आणि फिजिओ म्हणून तर एक मुंबईकर मुलगीच बांग्लादेश संघाला आकार देतेय. बांग्लादेश महिला क्रिकेट संघा ...
आपण खेळतो आणि आपण जिंकू शकतो, जिंकतो.. या दोन वेगळ्या गोष्टी. दोन वेगळ्या भावना. खेळाची संस्कृतीच नाही, तर खेळाडूंची मानसिकताच बदलून टाकणारा विक्रम तेव्हा घडतो. विदर्भानं रणजी जिंकणं ही त्या बदलाची सुरुवात आहे.. ...
येत्या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना इण्टर्नशिप करणं सक्तीचं असून, त्यांना योग्य इण्टर्नशिप मिळावी म्हणून प्रयत्न करणं महाविद्यालयं आणि शिक्षणसंस्थांसाठीही बंधनकारक. ...