ठिय्या व बंददरम्यान मराठा आंदोलक आक्रमक झाल्याने त्यावर दिशाहीनतेचा आरोप होऊ नये म्हणून तातडीने पावले उचलली गेली व सकल मराठा समाजातील नेते मंडळी पुनश्च एकसंधतेने पुढे आलेली पहावयास मिळाली, ही इष्टापत्तीच म्हणता यावी. आता या नेतृत्वकर्त्यांनी आरक्षणाच ...
आपल्याकडे उत्सवप्रियता अशी व इतकी काही भिनली आहे की, त्या नादात गरजेच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचेच राहून जाते. प्रासंगिक दिनविशेष साजरे करतानाही तसेच काहीसे होताना दिसते. उत्सव म्हणून ते साजरे केले जातात, त्यादिवशी कार्यक्रम-उपक्रमांची रेलचेल असते, प ...
नाशिक महापालिकेतील लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील मतभेदांची दरी दिवसेंदिवस रुंदावत चालली आहे. ती केवळ मतभिन्नतेच्याच पातळीवर राहिली नसून परस्परांना शह-काटशह देण्यापर्यंत पोहोचल्याने त्यातून कटुता वाढीस लागू पाहते आहे. सदरची बाब अंतिमत: शहराच्या वि ...
जुनं ते सोनं असे नेहमीच म्हटले जाते; परंतु प्रत्यक्षात जुन्या लोकांकडे घरात व बाहेरही दुर्लक्षच होत असल्याचे अधिकतर दिसून येते. राजकारणात तर जुनी माणसं अडगळीत टाकली गेल्याचेच पहावयास मिळते. आपल्या मताला किंमत नाही किंवा आपल्याला साधा सन्मानही मिळत ना ...
राजकारणात तर संधीची कवाडे उघडून घेण्यासाठीच समतेचा विचार मांडला जाताना दिसून येतो. त्यामुळे ओबीसी, बहुजन व वंचितांची मोट बांधून समता प्रस्थापित करण्यासाठी राज्यभर दौरे करणा-या प्रकाश आंबेडकर यांच्याकडूनही तोच कित्ता गिरवला जात असेल तर त्यात आश्चर्य व ...
मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी केल्या जात असलेल्या आंदोलनाला राज्यात काही ठिकाणी गालबोट लागले असले तरी, नाशकात कोणतीही अप्रिय घटना न घडता आतापर्यंतचे हे आंदोलन पार पडले यात येथील तरुणांच्या नेतृत्व क्षमतेचे यश आहे. विशेष म्हणजे, आंदोलनाच्या माध्यम ...
सरकारी उपक्रमांच्या उद्दिष्टपूर्तीकडे नेहमीच संशयाने बघितले जाते, कारण यंत्रणांच्या आकडेमोडीत फसवा-फसवीच अधिक असल्याचा अनेकदा अनुभव येतो. परंतु ज्या उपक्रमात लोकसहभाग मिळवण्यात यश येते, त्यात तशी वा तेवढी शंका न राहता बऱ्यापैकी उद्दिष्टपूर्ती साधणे श ...