प्रशासकीय शिस्तीसाठी प्रसिद्ध असलेले आणि त्यामुळेच 10 वर्षात 11 बदल्यांना सामोरे जावे लागल्याचा लौकिकही लाभलेले तुकाराम मुंढे यांना नाशिक महापालिका आयुक्तपदावरून हटविण्यासाठी सत्ताधारी भाजपाने कंबर कसली आहे. ...
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे. किती जागा लढायच्या, कुठून लढायच्या व तिथे उमेदवार कोण द्यायचे हा नंतरचा विषय; परंतु ...
शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या हिरे यांची भेट घेणे हे राजकारणातील तिरक्या चालीचेच लक्षण ठरावे. येऊ घातलेल्या निवडणुकांची पार्श्वभूमी त्यास लाभल्याने शंका-कुशंकांची व शिवसेनेतील फेरमांडणीच्या शक्यतांची राळ उडून जाणे स्वाभ ...
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांतर्फे संघटनात्मक वाढ-विस्तार केला जात असला तरी बहुतेकांच्या वाढलेल्या अपेक्षा लक्षात घेता त्यातून राजीपेक्षा नाराजीच अधिक घडून येताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या प्रदेश कार्य समितीची ...
वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांची माहिती गरजू वा संभाव्य लाभार्थींपर्यंत पोहोचविण्याकरिता राज्य शासनातर्फे हाती घेण्यात आलेल्या ‘युवा माहितीदूत’ उपक्रमाकडेही याच दृष्टिकोनातून बघता येणारे आहे. ...
गल्ली ते दिल्ली सत्तेत असलेल्या भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांना आगामी निवडणुकीतील पक्ष-कार्यासाठी कार्यकर्ते उपलब्ध होत नसतील तर ते ‘हायर’ करा, असे सांगण्याची वेळ यावी, यातच त्यांची अगतिकता सामावली आहे. पक्ष सत्तेत गेला; पण कार्यकर्ते जोडले गेले नाहीत. ज ...
आपल्याकडे कोणत्याही यशाला तत्कालिक कौतुकापलीकडे जाऊन बघण्याची दृष्टीच नाही. त्यामुळे पुरस्कारार्थीचे प्रासंगिक अभिनंदन वगैरे केले की विषय संपल्यात जमा होतो. त्यामुळे संस्थागत पातळीवर संबंधित यशोदायी कामाची माहिती घेऊन ते अन्यत्रही साकारण्याची प्रक्रि ...