सरकार व शिक्षणमंत्रीही यासंदर्भात ‘पूर्वीपेक्षा उत्तम’ परिस्थिती असल्याचे सांगत असतात, मात्र ग्रामीण भागातले चित्र अजूनही फारसे बदललेले नसल्याचेच आढळून येते. ...
शिवसेनेने स्वबळाचा नारा सोडून देत भाजपासोबत युती केली असली, तरी स्थानिक पातळीवर परस्परांविरोधात शड्डू ठोकून तयार बसलेल्यांत मनोमीलन घडून येणे म्हणावे तितके सहज सोपे नाही. यातही लोकसभा निवडणुकीत एकवेळ जमून जाईलही कारण तेथे इच्छुक कमी आहेत, परंतु विधान ...
कोणत्याही निर्णयाबाबतची समाधानकारकता केव्हा प्रत्ययास येते, तर घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी गतीने होऊन दृश्य स्वरूपात काही साकारलेले अगर घडून आलेले दिसून येते तेव्हा. ...
नाशकातील करवाढ अंतिमत: बव्हंशी तशीच राहिल्याचे पाहता, उगाच मुंढे यांच्या नावावर खेळ मांडून त्यांना घालविल्याचे म्हणता यावे. यातून भाजपाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर स्वत:ची नाकामी उघड करून दिली आहे. आता विरोधी पक्षीयांना भाजपाविरोधासाठी आणखी वेगळे मुद्द ...
वन्यप्राणी जंगलाकडून शहरात अथवा मानवी वस्तीकडे झेपावू लागले आहेत, कारण त्यांचा जंगलातील अधिवास तर धोक्यात आला आहेच; शिवाय भक्ष्य व पाण्याच्या शोधार्थ त्यांना त्याखेरीज पर्यायही उरलेला नाही. ...
राजकारणातील अविश्वसनीयता सर्वज्ञात आहे, कधी कोण सोबत येतील आणि कधी कशामुळे दुरावतील हे सांगता येत नाही; पण याचसोबत राजकारणात खोटं बोलल्याशिवाय चालत नाही असेही म्हटले तर ते सर्वमान्य ठरू नये. ...
येऊ घातलेल्या निवडणुकांच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून, सर्वच राजकीय पक्षांनी संघटनात्मक बळाचा वाढ-विस्तार चालविला आहे. काही इच्छुक उमेदवारांनी तर प्रचारही सुरू करून दिला आहे. परंतु काँग्रेसमध्ये शहराध्यक्ष बदलाचे वारे वाहात असून, स्थानिक पातळीवर सक्रिय ...
मनुष्यजन्म हा मोठ्या पुण्यकर्माने लाभतो असे म्हणतात, मग तसे असताना आणि शिवाय कौटुंबिक सौख्य-संपन्नता लाभूनही कुणाच्या मनाला आत्महत्येचा विचार का शिवावा, हा प्रश्न जसा बुचकळ्यात टाकणारा आहे तसाच किंवा तितकाच; आनंदी आयुष्याची स्वप्ने उबवायची सोडून चांग ...