ज्योत्स्ना गाडगीळ या Lokmat.com मध्ये सीनिअर कंटेंट रायटर आहेत. मुंबईच्या सेंट झेव्हिअर्स कॉलेजमधून पत्रकारितेत पदव्युत्तर पत्रकारिता केली असून टिळक विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. गेली १४ वर्षे त्या पत्रकारितेत काम करत आहेत. १० वर्षे मार्मिक साप्ताहिकात उपसंपादक/वार्ताहर म्हणून काम केले असून अलीकडच्या पाच वर्षात लोकमत डिजिटलवर 'भक्ती' विषयात सातत्याने लिखाण करत आहेत. नारदीय कीर्तनकार असल्यामुळे संगीत, अध्यात्म विषयात विशेष रुची आहे.Read more
विठ्ठलमय झालेले तुकाराम महाराज सांगतात, भगवंताशी इतके समरस व्हा, की अन्य दुय्यम गोष्टींना आयुष्यात थाराच उरणार नाही. सखा, सोबती भगवंत झाला, की प्रत्येक संवाद त्याच्याशीच होईल. मग ते लाडिक भांडण का असेना...! ...
देह हे देखील देवाचे मंदिर आहे. म्हणून ज्यापरामाणे मंदिरात गेल्यावर आपण क्षणभर विश्रांती घेतो, तशी आत्मचिंतनाच्या दृष्टीने आपल्या मनाच्या कट्ट्यावर देखील ध्यान धारणेच्या निमित्ताने विश्रांती घ्यावी आणि आत्मारामाचे चिंतन, स्मरण करावे. ...
आपण आयुष्यभर फक्त घ्यायला शिकलो, परंतु देण्याची सवय आपल्या हाताला नाही. ती जाणीवपूर्वक लावून घेतली पाहिजे. दानाची सवय नुसती लावून उपयोगाची नाही, ते सत्पात्री झाले पाहिजे, तरच उपयोग. ...
देहावर नियंत्रण मिळ्वण्याआधी मनावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. म्हणून समर्थांनी मनाला उपदेश केला. तसा उपदेश आपणही मनाला केला, तर बाह्य गोष्टींनी आपले मन दुःखी, कष्टी होणार नाही. ...