सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यात कॅन्सर रुग्णांचे सतत सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणात आढळलेल्या संशयित रुग्णांना तातडीने निदान करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. परंतु, अंतर व खर्चाचा विचार करून अनेक रुग्ण रुग्णालयापर्यंत जात नाही. ...