बीडमधील खाजगी ९९ रुग्णालयांमध्ये तिप्पट गर्भाशय शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 12:07 PM2019-07-17T12:07:30+5:302019-07-17T12:10:25+5:30

आजारांची भीती दाखवून शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचा संशय 

Triple uterine surgery in 99 private hospitals in Beed | बीडमधील खाजगी ९९ रुग्णालयांमध्ये तिप्पट गर्भाशय शस्त्रक्रिया

बीडमधील खाजगी ९९ रुग्णालयांमध्ये तिप्पट गर्भाशय शस्त्रक्रिया

googlenewsNext
ठळक मुद्देमहिलांच्या आरोग्याशी खेळ प्रकरण उघडकीस आल्यानंतर राज्यभरात उडाली खळबळ

- सोमनाथ खताळ 

बीड : येथील १० शासकीय आरोग्य संस्थापेक्षा खाजगी ९९ रुग्णालयांमध्ये तिप्पट शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले आहे.  महिलांना विविध आजारांची भीती दाखवून गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी मिळविली असता धक्कादायक माहिती समोर आली. 

बीड जिल्ह्यात मागील तीन वर्षांत ९९ खाजगी रुग्णालयांमध्ये तब्बल ४ हजार ६०५ गर्भाशय शस्त्रक्रिया झाल्या असून १० शासकीय संस्थांमध्ये १५५५ शस्त्रक्रिया झाल्याची नोंद सरकारी दप्तरी आहे. सरकारी दवाखान्यात सुविधा मिळत नाहीत, तेथे अनेक प्रश्न विचारतात, अशी भिती खाजगी रुग्णालयांकडून रुग्णांच्या मनात घातली जाते.

खाजगी रुग्णालयांमध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया करावयाची असल्यास जिल्हा शल्य चिकित्सक अथवा जिल्हा आरोग्य अधिकारी यांची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. ही परवानगी देताना तज्ज्ञ डॉक्टरकडून तपासणी केली जाते. तथ्य असेल तरच परवानगी दिली जाते. मागील दोन महिन्यांपासून हा आकडा मोठ्या प्रमाणात घटल्याचे सांगण्यात आले. 

गेवराई उपजिल्हा रुग्णालयाची समितीकडून तपासणी
च्गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आ.निलम गोºहे यांची चौकशी समिती मंगळवारी सायंकाळी बीड जिल्ह्यात आली. औरंगाबादहून येताना त्यांनी गेवराई उपजिल्हा रुग्णालयाची तपासणी केली. आ.निलम गोऱ्हे यांच्यासह प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, विद्या चव्हाण, पुणे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रा.शिल्पा नार्ईक समितीत आहेत.च्समितीतील इतर तिघे आले नसल्याचे सांगण्यात आले. सुरूवातीलाच आ. गोऱ्हे यांनी रूग्णालयाचा अहवाल तपासणी केली. त्यानंतर महिलांचा कक्ष, नेत्र विभाग, प्रसुती विभागाची तपासणी केली. गर्भाशय शस्त्रक्रियांचाही आढावा घेतला. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन वंजारवाडी गावातील महिलांशी त्या संवाद साधणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शासकीय आरोग्य संस्थांमधील शस्त्रक्रिया (२०१७ ते २०१९)
स्वाराती अंबाजोगाई    ६३३   
जि.रु.बीड            ५३१
उपजिल्हा रु. केज    २०६
उपजिल्हा रु.परळी    ७०
ग्रा.रु.माजलगाव     ६६
स्त्री रु.नेकनूर        २५
उपजिल्हा रु. गेवराई     २१
ग्रा.रु.पाटोदा        ०२
ग्रा.रु.धारुर        ०१
एकूण             १५५५

१५५५ महिलांनीच बीड येथील शासकीय रुग्णालयांमध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रियांचा आकडा या तुलनेत तिप्पट आहे.

Web Title: Triple uterine surgery in 99 private hospitals in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.