रोहयो कामातून सिल्लोडमधील गावांचा चेहरा बदलणार : सत्तार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:06 AM2021-05-09T04:06:10+5:302021-05-09T04:06:10+5:30

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून सिल्लोड येथे शासकीय यंत्रणेची शनिवारी बैठक संपन्न झाली. यावेळी रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांचे ...

Rohyo work will change the face of villages in Sillod: Sattar | रोहयो कामातून सिल्लोडमधील गावांचा चेहरा बदलणार : सत्तार

रोहयो कामातून सिल्लोडमधील गावांचा चेहरा बदलणार : सत्तार

googlenewsNext

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून सिल्लोड येथे शासकीय यंत्रणेची शनिवारी बैठक संपन्न झाली. यावेळी रोहयो मंत्री संदिपान भुमरे यांचे खासगी सचिव अशोक शिरसे, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, युवानेते अब्दुल समीर, उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, जि.प.चे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर वाघेकर, तहसीलदार विक्रम राजपूत, डॉ. संजय जामकर, पं. स. उपसभापती काकासाहेब राकडे, गटविकास अधिकारी अशोक दांडगे, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पा. गाढे, उपसभापती नंदकिशोर सहारे, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता के. बी. मराठे, अभियंता कल्याण भोसले यांची उपस्थिती होती.

बैठकीत यावर झाली चर्चा

पावसाळा सुरू होण्यास अद्याप एक महिना वेळ असल्याने रोजगार हमी योजनेतून गावातील गायरान जमिनीत सीसीटी, बांधबंदिस्ती, नाला बॅंडिंग, शिव रस्ते, वाडी रस्ते, पाणंद रस्ते इत्यादी कामे प्राधान्याने करणे, रोजगार हमी योजनेतून सामूहिक आणि व वैयक्तिक कामे सुरू करणे, वन विभाग व कृषी विभाग यांनी समन्वयातून वन क्षेत्रात व गायरान जमिनीवर वृक्ष लागवड व सिंचनाची कामे करणे. तुती लागवडीसाठी नियोजन करून शेतकऱ्यांना रेशीम उत्पादनासाठी प्रवृत्त करणे, कृषी विभागाने फळबाग लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करणे, गावागावात गाईच्या गोठ्यासाठी पात्र लाभार्थींना लाभ देणे, दुग्धव्यवसाय यासाठी प्रवृत्त करणे, या पद्धतीने उपाययोजना करणे इत्यादी विषयांवर सखोल चर्चा या बैठकीत झाली.

Web Title: Rohyo work will change the face of villages in Sillod: Sattar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.