वर्धापनदिनी निवृत्त प्राध्यापकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:06 AM2021-09-24T04:06:16+5:302021-09-24T04:06:16+5:30

-- औरंगाबाद : मराठवाड्यात १९२३ मध्ये उच्च शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम बुधवारी झाला. ...

Honoring Retired Professors on Anniversary | वर्धापनदिनी निवृत्त प्राध्यापकांचा सन्मान

वर्धापनदिनी निवृत्त प्राध्यापकांचा सन्मान

googlenewsNext

--

औरंगाबाद : मराठवाड्यात १९२३ मध्ये उच्च शिक्षणाची दारे खुली करणाऱ्या शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम बुधवारी झाला. महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून निवृत्त प्राध्यापकांचा सन्मान केला.

उच्च शिक्षण सहसंचालक डाॅ. रणजितसिंह निंबाळकर, डाॅ. जी. एस कुलकर्णी, प्राचार्य डाॅ. राजेंद्र सातपुते यांच्या हस्ते सेवानिवृत्त प्राध्यापकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. महाविद्यालयाची शतकपूर्ती २०२३ मध्ये साजरी होणार आहे. मराठवाड्यातील शिक्षणाची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या महाविद्यालयाच्या इतिहासातील पाऊलखुणा डाॅ. कुलकर्णी यांनी अधोरेखित केल्या, तर महाविद्यालयाच्या शतकपूर्ती सोहळ्यात सर्वांनी सहकार्य करण्याची अपेक्षा प्राचार्य सातपुते यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात डाॅ. सुनीता पाटील (दळवी), डाॅ. मंजुषा मोळवणे, संजीवणी गोडसे, श्रीमती राव, श्रीमती रज्जीया यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. गास्का स्टाफ मंडळाचे अध्यक्ष डाॅ. बी. पी. लहाने यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन डॉ. पंकजा वाघमारे यांनी केले, तर डॉ. सुलोचना राठोड यांनी आभार मानले.

---

फोटो ओळ : शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात निवृत्त प्राध्यापकांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी मान्यवर.

Web Title: Honoring Retired Professors on Anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.