जिल्ह्यात उच्चांकी १,९६४ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:05 AM2021-04-11T04:05:22+5:302021-04-11T04:05:22+5:30

औरंगाबाद : जिल्ह्यात काही दिवसांपासून दिलासा व्यक्त होत असतानाच शनिवारी कोरोना रुग्णसंख्येने आजपर्यंतच्या उच्चांकी रुग्णसंख्येचा आकडा गाठला. दिवसभरात तब्बल ...

The highest number of 1,964 corona patients in the district | जिल्ह्यात उच्चांकी १,९६४ कोरोना रुग्णांची वाढ

जिल्ह्यात उच्चांकी १,९६४ कोरोना रुग्णांची वाढ

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात काही दिवसांपासून दिलासा व्यक्त होत असतानाच शनिवारी कोरोना रुग्णसंख्येने आजपर्यंतच्या उच्चांकी रुग्णसंख्येचा आकडा गाठला. दिवसभरात तब्बल १,९६४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,१९९ जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ तासांत २६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २५ आणि अन्य जिल्ह्यांतील एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,५६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ९७ हजार ४१२ झाली आहे, तर आतापर्यंत ७९ हजार ८९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १, ९५२ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,९६४ रुग्णांत महापालिका हद्दीतील १०८७ तर ग्रामीण भागातील आजपर्यंतच्या सर्वाधिक ८७७ रुग्णांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील ८०० आणि ग्रामीण ३९९, अशा १,१९९ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना गंगापूर येथील ५५ वर्षीय महिला, सातारा परिसरातील ५६ महिला, बोडखा, खुलताबाद येथील ७५ वर्षीय महिला, तापडियानगर येथील ८१ वर्षीय पुरुष, निमखेडा, फुलंब्रीतील ६५ वर्षीय पुरुष, भारतमातानगर येथील ६८ वर्षीय पुरुष, एन-१२, हडकोतील ६२ वर्षीय पुरुष, कोकणवाडी, पदमपुरा येथील ५४ वर्षीय पुरुष, ऊर्जानगर येथील ५० वर्षीय महिला, कैलासनगर येथील ४५ वर्षीय पुरुष, सिंधी काॅलनीतील ३० वर्षीय पुरुष, पाचोड, पैठण येथील ५२ वर्षीय पुरुष, सावंगी हर्सूल येथील ६५ वर्षीय महिला, सखारामपंतनगर, गंगापूर येथील ६६ वर्षीय पुरुष, सिडको, मयूरनगर ६९ वर्षीय महिला, हासनबादवाडी येथील ७० वर्षीय पुरुष, भीमनगर येथील ६१ वर्षीय महिला, दौलताबाद येथील ६५ वर्षीय महिला, वरूड, कन्नड येथील ६० वर्षीय पुरुष, नागयगाव आळंद, फुलंब्री येथील ६० वर्षीय पुरुष, एन-११ यथील ८० वर्षीय पुरुष, इटखेडा, पैठण रोड येथील ७० वर्षीय पुरुष, एन-१ येथील ८५ वर्षीय महिला, जयभवानीनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, श्रीरामनगर येथील ७१ वर्षीय महिला आणि खायगाव, बीड येथील ४९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

महापालिका हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद १५, बीड बायपास ३६, सातारा परिसर ३६, शिवाजीनगर १७, गारखेडा परिसर १४, घाटी ४, भावसिंगपुरा ४, ग्रामीण १, श्रेयनगर ४, एमआयडीसी चिकलठाणा ४, न्यू बन्सीलालनगर १, चिकलठाणा ८, विहारनगर १, सिडको ४, त्रिमूर्ती चौक १, एन-४ येथे ९, जवाहर कॉलनी ८, न्यू पंचशीलनगर १, गजानन कॉलनी २, नागेशनगर २, निशांत पार्क १, बिशंत पार्क १, कांचनवाडी ९, उस्मानपुरा ८, चाणक्यपुरी २, आलोकनगर २, शिवशंकर कॉलनी ४, एकनाथनगर ४, रेल्वे स्टेशन २, ईटखेडा ५, नाईकनगर ३, हर्सूल ५, म्हाडा कॉलनी ४, दर्गा चौक ४, सिल्कमिल कॉलनी १, उद्योग इंद्रकमल सोसायटी ३, मुकुंदवाडी ७, जयनगर १, एन-६ येथे १०, ऊर्जानगर १, कासलीवाल मार्बल ३, विजयनगर ३, एन-११ येथे ९, जय भवानीनगर ९, श्रेय नगर १, पद्मपुरा ५, महानगरपालिका १, शांतीपुरा १, प्रज्ञानगर १, जयसिंगपुरा १, नक्षत्रवाडी १, जटवाडा रोड ३, आरेफ कॉलनी १, मयूर पार्क ४, उदय कॉलनी १, पिसादेवी रोड १, बेगमपुरा ३, एन-२ येथे १९, एन-१२ येथे २, जाधववाडी ४, होनाजीनगर ३, रामनगर ४, एन-४ येथे ३, द्वारकादासनगर १, शहागंज १, कोतवालपुरा १, ज्युब्ली पार्क १, लक्ष्मी कॉलनी छावणी ३, नंदनवन कॉलनी ४, पहाडसिंगपुरा २, आविष्कार कॉलनी ४, न्यू एसबीएच कॉलनी १, एन-१ येथे ४, म्हसोबानगर २, टी.व्ही. सेंटर ३, ऑडिटर सोसायटी १, एन-७ येथे १३, पुंडलिकनगर ८, शिवनगर १, आदिनानगर १, गजानननगर ५, व्यंकटेश कॉलनी १, स्वप्ननगरी ३, सुमंगल विहार २, उल्कानगरी ९, देवळाई २, टिळकनगर १, पहाडे कॉर्नर १, तुळजाईनगर १, राजेशनगर १, बजरंगनगर १, कासलीवाल कॉम्प्लेक्स १, के.सी. कॉप्लेक्स १, राजीव गांधीनगर १, शिवशनीनगर १, गणेशनगर १, हनुमाननगर ३, सुधाकरनगर १, कामगार चौक १, संतोषी मातानगर १, शहानूरवाडी ३, चौधरी कॉलनी १, ठाकरेनगर २, मराठा हायस्कूल २, विजय कॉलनी १, बंजारा कॉलनी १, पडेगाव ८, जहागीरदार कॉलनी १, रमा नगर १, शांतीनाथ सोसायटी १, संजयनगर १, पैठण रोड ४, जयविजय भारती कॉलनी १, दिशा संस्कृती २, सेवन हिल २, नागेश्वरवाडी १, हॉटेल ग्रीन लिफ १, जालाननगर ७, समता नगर १, द्वारकापूरी १, जिल्हाधिकारी कार्यालय १, गादिया विहार २, आकाशवाणी कॉलनी १, प्रकाशनगर १, एन-८ येथे ५, माणिकनगर १, जे.जे.प्लस हॉस्पिटल १, खडकेश्वर २, मिटमिटा ४, नारेगाव एमआयडीसी १, फाजलपुरा १, हिमायतनगर १, न्यू हनुमाननगर ४, ज्योती प्राईड २, छत्रपतीनगर २, ज्ञानेश्वरनगर १, वृंदावन कॉलनी १, पेशवेनगर १, देवानगरी ४, विद्यानगर १, वसंत विहार २, देवळाई रोड १, बालाजीनगर २, एकनाथनगर १, वास्तुशिल्प अपार्टमेंट १, हमालवाडा १, अप्रतिम घरकुल १, अजित हाईट्स २, अप्रतिम पुष्प १, नवजीवन कॉलनी २, कार्तिकनगर १, एकतानगर २, राधास्वामी कॉलनी १, प्रतापगडनगर १, सारा वैभव १, ग्रॅण्ड कल्याण २, प्रतापनगर ३, झाकीर हुसेन सोसायटी १, ईएसआयसी हॉस्पिटल ४, आंबेडकरनगर २, सुराणानगर ३, तिरूपती पार्क १, एन-९ येथे १०, न्यू भारत सोसायटी १, कॅनॉट गार्डन १, उदय कॉलनी खडकेश्वर १, गंगोत्री कॉम्प्लेक्स १, एन-१० येथे १, सारा वैभव जटवाडा रोड ३, भडकल गेट १, तारांगण पार्क १, रेल्वे एम्प्लॉई स्टाफ १, केळी बाजार १, अमृतसाई प्लाझा १, स्टेशन रोड १, तिरूपती सोसायटी जालाननगर १, गांधीनगर २, नवी वस्ती पद्मपुरा १, एसआरपीएफ कॅम्प १, मुकुंदनगर ४, आईसाहेबनगर हर्सूल १, विठ्ठलनगर १, एन-१३ येथे १, कैलाशनगर ३, कासलीवाल तारांगण १, एन-३ येथे १, विमानतळ कॉलनी १, रघुवीरनगर २, भुजबळनगर १, एमआयडीसी रोड रेल्वे स्टेशन १, सीएसएमएसएस २, शहागंज १, औरंगाबाद विमानतळ स्टाफ १, म्हाडा कॉलनी बाबा पेट्रोल पंप १, ज्योतीनगर १, सिंधी कॉलनी २, समर्थनगर ६, अदालत रोड १, क्रांतीनगर १, आदर्श नगर १, नंदिग्राम कॉलनी १, बन्सीलालनगर २, दिशा घरकुल १, झवेरी वाडा गुलमंडी १, न्यू उस्मानपुरा १, जिजामाता कॉलनी २, गोविंदनगर १, अन्य ४७९.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर ७, सिडको वाळूज महानगर १०, लाडसावंगी २, पिसादेवी ४, रांजणगाव १, बाळापूर फाटा १, सिंदोन २, वाळूज एमआयडीसी ३, जैतखेडा कन्नड १, कन्नड १, लक्ष्मीनगर २, सवेरा पायेरस २, सिल्लोड १, शेंद्रा एमआयडीसी २, सातारा खंडोबा मंदिर १, सावंगी ३, तिसगाव २, सह्याद्री लॉन १, पैठण १, माळीवाडा ३, बाजारसावंगी १, अंजनडोह १, माखणी गंगापूर १, पाचोड ता. पैठण १, हर्सूल गाव १, वडगाव कोल्हाटी ५, अयोध्यानगर वाळूज २, न्यू अष्टविनायक चौक वाळूज १, द्वारकानगरी वाळूज १, समता कॉलनी वाळूज १, गाढे जळगाव २, आडगाव १, बिडकीन १, रॅडिको एन.व्ही. शेंद्रा एमआयडीसी ८, आपेगाव १, आडगाव सरक १, परसोडा वैजापूर १, लाडगाव १, खंडाळा पैठण १, चौका फुलंब्री १, अन्य ७९४

------

यापूर्वीची उच्चांकी रुग्णसंख्या

१७९१- २३ मार्च २०२१

१७८७- २६ मार्च २०२१

Web Title: The highest number of 1,964 corona patients in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.