अर्धवट रस्ते पावसाळ्यात ठरणार डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:05 AM2021-05-19T04:05:27+5:302021-05-19T04:05:27+5:30

खुलताबाद : तालुक्यातील नागरिकांसाठी औरंगाबाद शहर जवळ करणारा काटशेवरी ते जटवाडा व म्हैसमाळ रस्ता, यंदाच्या पावसाळ्यात डोकेदुखी ठरणार आहे. ...

Half the roads will be a headache in the rain | अर्धवट रस्ते पावसाळ्यात ठरणार डोकेदुखी

अर्धवट रस्ते पावसाळ्यात ठरणार डोकेदुखी

googlenewsNext

खुलताबाद : तालुक्यातील नागरिकांसाठी औरंगाबाद शहर जवळ करणारा काटशेवरी ते जटवाडा व म्हैसमाळ रस्ता, यंदाच्या पावसाळ्यात डोकेदुखी ठरणार आहे. ठिकठिकाणी अर्धवट अवस्थेत कामांमुळे आधीच हा रस्ता धोकादायक बनला असून, पावसाळ्यात होणार हाल तर न विचारलेलेच बरे.

औरंगाबाद शहराला जोडणारा महामार्ग रखडल्याने खुलताबाद तालुक्याचा विकासाचा मार्ग रखडल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांची झाली आहे.

तालुक्यातील शेतकरी, कर्मचारी अशा सर्वांना सोयीचा असलेला आणि बहुतांशी गावांना शहराशी जोडणारा जवळचा मार्ग म्हणजे काटशिवरी-जटवाडा- औरंगाबाद हा रस्ता होय. या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण होण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी अनेक वेळा रास्ता रोको, धरणे आंदोलन केली आहेत. परिणामी, राज्य शासनाने या रस्त्याचे काम हाती घेतले, परंतु गेल्या दोन वर्षांपासून काम चालू असून, डांबरीकरणाचे काही अर्धवट अवस्थेत पडलेले आहे. या रस्त्यातील अनेक ठिकाणी पुलाचे काम आणि डांबरीकरणाचे काम बाकी आहे. खराब रस्त्यांमुळे रात्री-अपरात्री येथून जाणे जीवघेणे ठरू लागले आहे. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्त्याची कामे करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.

दोन वर्षांपासून कामे रखडली

पावसाळा सुरू होण्यापूर्वी तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी करण्याची मागणी केली जात आहे. तालुक्यातील खुलताबाद-म्हैसमाळ, काटशिवरीफाटा ते जटवाडा या मार्गाचे काम दोन वर्षांपासून जाणूनबुजून पूर्ण केल्या जात नाही. धामणगाव-लोणी-बोडखा, खुलताबाद-खिर्डी, वेरुळधून गेलेला धुळे राष्ट्रीय महामार्ग आदी रस्त्यांची कामे रखडली आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. मृत्यूचा सापळा बनला आहे.

फोटो : म्हैसमाळ व काटशिवरी फाटा ते जटवाडा रस्ता पावसाळ्यात असा चिखलयुक्त होतो. फोटो संग्रहीत

Web Title: Half the roads will be a headache in the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.