राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:12 AM2017-12-23T01:12:51+5:302017-12-23T01:12:58+5:30

सांगली येथे २४ डिसेंबर रोजी होणाºया राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला.

District squad announced for state level crossover tournament | राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ जाहीर

राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ जाहीर

googlenewsNext

औरंगाबाद : सांगली येथे २४ डिसेंबर रोजी होणाºया राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी औरंगाबाद जिल्ह्याचा संघ जाहीर करण्यात आला.
हा संघ विद्यापीठात झालेल्या निवड चाचणीद्वारे निवडण्यात आला. निवडलेला संघ पुढीलप्रमाणे :
खुला गट मुले : नितीन तळीकोटी, शेकू वाघ, राकेश यादव, प्रकाश धनवट, रमेश गुमलाड़ू, अभिजित वाघमारे. मुली : पूजा राऊत, सोनिया गायके, सना पठाण, सायली किर्गत. १६ वर्षांखालील मुले : आनंद घुनावत, संतोष घुनावत. मुली : शीतल जोनवाल, अनुप्रिता पवार.
१८ वर्षांखालील मुले : सुज्वल नाईक, आकाश बमनावत. मुली : निकिता बमनावत, प्रतीक्षा पवार. २० वर्षांखालील मुले : रामेश्वर मुंजळ, प्रदीप वाघ, भरत बिघोत, कृष्णकुमार कछवा. मुली : नंदिनी पवार, सविता गायकवाड, प्रतीक्षा गायकवाड, प्रणाली गायकवाड. या संघाला जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, कार्याध्यक्ष रंजन बडवने, सचिव फुलचंद सलामपुरे, राज्य हॉकी संघटना उपाध्यक्ष पंकज भारसाखळे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक दयानंद कांबळे, उपाध्यक्ष मोहन मिसाळ, कोषाध्यक्ष प्राचार्य बाबूराव गंगावणे, प्राचार्या शशिकला नीलवंत, अनिल निळे, मोहम्मद रियाजुद्दीन आदींनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: District squad announced for state level crossover tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.