coronavirus : नांदेडमध्ये ११४ बाधितांची वाढ, दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 08:07 PM2020-08-08T20:07:23+5:302020-08-08T20:08:21+5:30

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या पोहचली ३१५६ वर

coronavirus: An increase of 114 cases in Nanded, two deaths | coronavirus : नांदेडमध्ये ११४ बाधितांची वाढ, दोघांचा मृत्यू

coronavirus : नांदेडमध्ये ११४ बाधितांची वाढ, दोघांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देआतापर्यंत एकूण ११६ जणांचा कोरोनामुळे बळी१ हजार ४१५ रुग्ण कोरोनामुक्त

नांदेड : जिल्ह्यात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे़ शनिवारी ११४ बाधित रुग्ण आढळले असून दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ आजपर्यंत बाधितांची संख्या ३ हजार १५६ तर बळींचा आकडा ११६ वर पोहचला आहे़

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात सरासरी दीडशे बाधित रुग्ण आढळून येत आहेत़ त्यामुळे रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे़ शनिवारी प्रशासनाला ४५६ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते़ त्यापैकी २९३ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत़ तर ११४ बाधित आढळून आले़ त्यामध्ये आरटीपीसीआरद्वारे केलेल्या तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र २८, अर्धापूर २, बिलोली १, भोकर ४, कंधार १, नायगांव १, लोहा १, हिंगोली १, यवतमाळ १, नांदेड ग्रामीण २, देगलूर १४, हदगांव ८, किनवट १, मुखेड २२, उमरी १, परभणी ३ आणि लातूर जिल्ह्यातील १ रुग्ण आढळून आला आहे़ तर अँटीजेन किट्सद्वारे केलेल्या तपासणीत नांदेड मनपा क्षेत्र २, अर्धापूर ४, बिलोली ३, धर्माबाद १, देगलूर ३, किनवट २, नायगांव ४ आणि माहूर तालुक्यात ३ बाधित रुग्ण आढळून आले आहेत़ सिडको नांदेड येथील ७२ वर्षीय महिला आणि अर्धापूर तालुक्यातील कासारखेडा येथील ७२ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे़ सध्या रुग्णालयामध्ये १ हजार ६०८ जणांवर उपचार सुरु आहेत़ त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णूपुरी १६१, पंजाब भवन ६२६, जिल्हा रुग्णालय ५३, नायगांव ८३, बिलोली ३८, मुखेड १३१, देगलूर ९५, लोहा १३, हदगांव ६४, भोकर ८, उमरी १४, कंधार १७, धर्माबाद २१, किनवट ३१, अर्धापूर २०, मुदखेड १७, हिमायतनगर २०, माहूर १८, आयुर्वेदीक कॉलेज २८, बारड ५, खाजगी रुग्णालय १३७, औरंगाबाद येथे ५, निजामाबाद १, हैद्राबाद १ आणि मुंबई येथे एका रुग्णाला संदर्भित करण्यात आले होते़

आतापर्यंत १ हजार ४१५ कोरोनामुक्त
शनिवारी जिल्ह्यातील ९२ जणांनी कोरोनावर मात केली़ त्यामुळे रुग्णालयातून त्यांना सुट्टी देण्यात आली़ त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णूपुरी १३, नायगांव १५, जिल्हा रुग्णालय ४, देगलूर १०, खाजगी रुग्णालय ११, बिलोली ४, गोकुंदा ५, धर्माबाद १० आणि पंजाब भवन येथून २० रुग्णांना घरी पाठविण्यात आले़ आतापर्यंत १ हजार ४१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ दरम्यान, शहरातील पंजाब भवन, विष्णूपुरी येथील रुग्णालय सध्या हाऊसफुल्ल झाले आहे़ त्यामुळे आयुर्वेदीक रुग्णालयात आता बाधित रुग्णांना ठेवण्यात येत आहे़ त्याचबरोबर इतर पर्यायी जागीही प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे़ 

Web Title: coronavirus: An increase of 114 cases in Nanded, two deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.