Corona Virus In Aurangabad : कर्फ्युमध्ये रस्त्यावर धिंगाणा घातला; सिल्लोडमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 05:27 PM2020-03-27T17:27:59+5:302020-03-27T17:28:24+5:30

संचारबंदीचे केले उल्लंघन

Corona Virus In Aurangabad: Five people were charged in the Sillod who breaks curfew | Corona Virus In Aurangabad : कर्फ्युमध्ये रस्त्यावर धिंगाणा घातला; सिल्लोडमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Corona Virus In Aurangabad : कर्फ्युमध्ये रस्त्यावर धिंगाणा घातला; सिल्लोडमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

googlenewsNext

सिल्लोड: सर्वत्र कर्फ्यु असताना विनाकारण मास्क न वापरता रस्त्यावर फिरणाऱ्या पांच लोकांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे, सदाशिव देवराव तायडे वय 30 वर्षे रा . पिपळगाव घाट, सोमनाथ हनमंतराव क्षिरसागर वयः 30 वर्षे , रा तिडका , ता.सोयगाव , पंढरीनाथ अंबादास मुळे वय 40 वर्षे  रा . केळगाव , अनिल ओंकार भोठकर रा. पिपंळगाव घाट,  राहुल अशोक ईगळे वय 21 वर्षे  रा . पिपंळगाव घाट अशी आहेत.


शुक्रवारी दुपारी  रोजी 02.30 वाजेच्या सुमारास केळगाव ते अंभई  रोडवर पंढरीनाथ अंबादास मुळे याच्या शेताजवळ सार्वजनिक रोडवर आरोपींनी एकत्र येऊन सार्वजनिक व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करुन कोरोना विषाणु संसर्ग पसरेल असे कृत्य केले. शासनाचे विविध आदेशाचे भंग करुन  जिल्हा अधिकारी औरंगाबाद याचे कलम 144 संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केले.

किरण बिडवे यांचे मार्गदर्शना खाली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक  विकास आडे, पोलीस हवालदार देविदास जाधव, पोलीस नाईक सचिन सोनार, काकासाहेब सोनवणे, दीपक इंगळे  करीत आहे. कोरोना व्हायरस वेगात पसरत असल्याने, शासनाच्या आदेशाने (अत्यावश्यक सेवा वगळून) सर्वाना घरी थांबणे बाबत जन जागृती सध्या चालू आहे. परुंतु सदर आदेशाचे जो उल्लंघन करील त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे किरण बिडवे यांनी सांगितले.

सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडीत पुंडलीकराव इंगळे यांनी दिलेल्या तक्रारी वरून  कलम 188 , 269 , 270 , 290 , 336 सह मु पो कायदा 37 ( 1 ) ( 3 ) . 135 . साथरोग प्रतीबंध अधिनियम 1897 चे कलम 2 , 3 , 4 , महाराष्ट्र कोवीड 19 उपाय योजना 2020 लियम 11 सह राष्टीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ( ब ) , कलम 144 सीआरपीसी प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Corona Virus In Aurangabad: Five people were charged in the Sillod who breaks curfew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.