Brazil's king of pop n politics Gilberto Gill is on tour of Ajnatha-Ellora | 'द किंग ऑफ पॉप'; ब्राझिलियन पॉपस्टार गिलबर्टो गिल अजिंठा-वेरूळच्या पर्यटनावर
'द किंग ऑफ पॉप'; ब्राझिलियन पॉपस्टार गिलबर्टो गिल अजिंठा-वेरूळच्या पर्यटनावर

ठळक मुद्देसंगीतासाठी दिला मंत्रिपदाचा राजीनामा

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : पर्यटनाचा शाही आनंद देणारी डेक्कन ओडीसी रेल्वे गुरुवारी औरंगाबादेत दाखल झाली. पर्यटनाच्या या शाही रेल्वेने ब्राझीलचे विख्यात गायक गिलबर्टो गिल आले आहेत.

गिलबर्टो गिल ब्राझिलचे प्रसिद्ध गायक आहेत आणि विश्व स्तरावर त्यांनी अनेक पारितोषिक मिळवली आहेत. ते ब्राझिलचे संस्कृती मंत्री पदावरही कार्यरत होते. संगीतासाठी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. गिलबर्टो गिल हे ब्राझीलच्या संगीताची खरी ओळख आहे, असे म्हटले जाते. गिल यांच्यासह २२ पर्यटक आले असून, या पर्यटकांचे रेल्वेस्थानकावर दिलीप खंडेराय यांच्या कलापथकातर्फेतर्फे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. या स्वागताने ते भा रावून गेले.

यावेळी टुरिझम प्रमोटर्स गिल्ड औरंगाबादचे जसवंतसिंग यांची उपस्थिती होती . गिल आणि पर्यटक वेरूळ लेणी पाहण्यासाठी रवाना झाले.


Web Title: Brazil's king of pop n politics Gilberto Gill is on tour of Ajnatha-Ellora
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.