जाहिरात करणाऱ्या वकिलांविरुद्ध कारवाईचा बार कौन्सिलचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 02:37 AM2019-09-24T02:37:29+5:302019-09-24T02:37:34+5:30

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र, गोवाकडून बार असोसिएशनला पत्र

Bar Council's Warning for Prosecution Advocates | जाहिरात करणाऱ्या वकिलांविरुद्ध कारवाईचा बार कौन्सिलचा इशारा

जाहिरात करणाऱ्या वकिलांविरुद्ध कारवाईचा बार कौन्सिलचा इशारा

googlenewsNext

- खुशालचंद बाहेती 

औरंगाबाद : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्याकडून स्वत:ची जाहिरात करणाºया वकिलांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देणारे पत्र सर्व जिल्हा बार असोसिएशनला पाठविले आहे. प्रसारमाध्यम तसेच व्हॉटस्अ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांवरील जाहिरातींचीही दखल घेण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

वकिलांच्या जाहिरातींबद्दलच्या काही घटना लक्षात आल्यानंतर हे पत्र पाठविण्यात आले आहे. बार कौन्सिल आॅफ इंडियाने अ‍ॅडव्होकेटस् अ‍ॅक्ट अंतर्गत वकिलांच्या वर्तणुकीबद्दल काही नियम बनविले आहेत. हे नियम वकिलांना बंधनकारक आहेत. बार कौन्सिल नियम ३६ प्रमाणे वकिलांना स्वत:ची जाहिरात करण्यास प्रतिबंध आहेत. वकिलांसाठीच्या नियमात स्पष्ट करण्यात आले आहे की, वकिलांची नेमप्लेट ही योग्य साईजची असावी. नावाच्या पाटीवर किंवा लेटरहेडवर ते बार कौन्सिलचे पदाधिकारी आहेत किंवा होते याचा उल्लेख नसावा. ते एखाद्या प्रकारच्या खटल्यात विशेष तज्ज्ञ असल्याचा उल्लेखही नसावा किंवा ते पूर्वी न्यायाधीश किंवा सरकारी अभियोक्ता, अ‍ॅडव्होकेट जनरल असतील तर त्याचाही उल्लेख नसावा. वकिलांच्या जाहिरातीसंबंधी नियमांचे उल्लंघन झाल्याचे लक्षात आल्यास ती व्यावसायिक गैरवर्तणूक समजून कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बार कौन्सिल आॅफ इंडियाचे असे आहेत नियम
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जाहिरात करून काम मिळवण्यास प्रतिबंध.
सर्क्युलर, वैयक्तिक पत्रव्यवहार, एजंटांमार्फत काम मिळविण्यास प्रतिबंध.
वृत्तपत्रात स्वत:च्या केससाठी स्वत:चे फोटो छापण्यास पाठविणे, प्रतिक्रिया पाठविण्यास प्रतिबंध.

वकिली हा व्यवसाय नाही. वकिलांचे काम हे मालाच्या विक्रीचे काम नाही. त्यामुळे व्यावसायिक स्पर्धेमुळे विधि व्यवसाय बदनाम होऊ नये.
(न्यायमूर्ती कृष्णा अय्यर - बार कौन्सिल आॅफ महाराष्टÑ वि. एम. व्ही. दाभोलकर)

Web Title: Bar Council's Warning for Prosecution Advocates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.