शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा :भारतीय मिश्र रिले संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2019 04:16 IST

भारतीय मिश्र रिले संघ येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरी गाठत टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिकस्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

दोहा : भारतीय मिश्र रिले संघ येथे सुरु असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत अंतिम फेरी गाठत टोकियो येथे होणाऱ्या आॅलिम्पिकस्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. शनिवारी झालेल्या स्पर्धेत ४ बाय ४०० मिटर प्रकारात भारताच्या संघाने अंतिम फेरी गाठली.मोहम्मद अनस, व्ही.के. विस्मय, जिस्ना मॅथ्यू व टॉम निर्मल नोह यांचा समावेश असणाºया संघाने ३ मिनिट १६.१४ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत तिसरा तर हिटमध्ये दुसरा क्रमांकासह अंतिम फेरी गाठली.प्रत्येक दोन हिटमधील पहिले तीन संघ रविवारी होणाºया अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. अंतिम फेरीत पोहचलेले आठ संघ टोकियो येथे २०२० मध्ये होणाºया आॅलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.दरम्यान, भारतीय धावपटू द्युती चंद हिचे विश्व अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेतील आव्हान शनिवारी पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. शनिवारी द्युती चंद हिने येथे महिलांच्या १०० मीटर शर्यतीत या हंगामातील सर्वांत खराब वेळ ११.४८ सेकंद नोंदवली.द्युती हिट क्रमांक तीनमध्ये सातव्या आणि एकूण ४७ स्पर्धकांमध्ये ३७ व्या क्रमांकावर फेकली गेली. आॅलिम्पिक २०१२ ची चॅम्पियन जमैकाची शैली एन. फ्रेजर प्रिस हिने १०.८० सेकंद आणि आयवरी कोस्टची गतवेळेसची रौप्यपदकप्राप्त मेरी जोस ता लू हिने १०.८५ सेकंदांची वेळ नोंदवली. भारताचा लांबउडीपटू एम. श्रीशंकर याला पात्रता फेरीतच २२व्या क्रमांकावर समाधान मानावेलागले.जाबीर पराभूतपुरुषांच्या ४०० मिटर अडथळा शर्यतील भारताच्या एम.पी.जाबीरने उपांत्यफेरी गाठत अपेक्षा उंचावल्या होत्या.मात्र जाबीरने ही स्पर्धा ४९.७१ या वेळात पूर्ण केली. तो १६ व्या स्थानी राहिला. सध्याचा जागतिक चॅम्पियन वारलोल्म याने ४८.२८ सेकंदासह अंतिम फेरी गाठली. 

टॅग्स :IndiaभारतOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020