शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ST बंदचा फटका, प्रवाशांनी खचाखच भरलेली खासगी बस नाल्यात पडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 13:42 IST

अमरावतीवरून मोर्शीमार्गे मध्य प्रदेशातील बैतुलकडे एक खासगी बस जात होती. ही खाजगी बस नाल्यात पलटी झाल्याची घटना अमरावती-नागपूर महार्गावर अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात घडली.

अमरावती - राज्यात अद्यापही एसटी बंद असल्याने खासगी प्रवासी वाहतूक जोर धरत आहे. त्यातच, शहरातील अर्जुन नगर परिसरात खासगी बस नाल्यात पलटली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. अमरावतीवरुन मोर्शीमार्गे मध्य प्रदेशकडे ही बस जात होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, सर्व प्रवासी सुखरूप आहेत. बसमध्ये ४० पेक्षा अधिक प्रवासी होते. अमरावती-नागपूर महामार्गावरील अर्जुननगर परिसरातील घटना ही घटना घडली. 

अमरावतीवरून मोर्शीमार्गे मध्य प्रदेशातील बैतुलकडे एक खासगी बस जात होती. ही खाजगी बस नाल्यात पलटी झाल्याची घटना अमरावती-नागपूर महार्गावर अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात घडली. सुदैवाने दैव बलवत्तर म्हणून या अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत. कुठलीच जीवितहानी झाली नाही. बसमध्ये जवळपास चाळीसपेक्षा जास्त प्रवासी होते. बस पूर्ण क्षमतेने होती. दरम्यान, किरकोळ जखमी असलेल्या प्रवाशांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतले. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे. 

दरम्यान, एसटी महामंडळच्या बस बंद आहेत. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर अमरावती शहरात अवैधपणे खासगी वाहतूक सुरू आहे. आज सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मध्यप्रदेशमधील होशगांबाद येथील एक खासगी बस अमरावतीमधून मोर्शीमार्गे मध्य प्रदेशमध्ये प्रवासी घेऊन जात होती. सध्या एसटी बस बंद आहेत, त्यामुळं ही खासगी बस खचाखच प्रवाशांनी भरून होती. अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात ही बस येताच रोडच्या कडेला असलेल्या एका नाल्यात पलटी झाली. लहान चिमुकले बचावले. अपघाताचे कारण अस्पष्ट असून चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला, असावा असा अंदाज व्यक्त होत आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपAmravatiअमरावतीBus DriverबसचालकAccidentअपघात